सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने काल रात्री सॅनिटायझर प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. अविनाश अशोक जाधव असे त्याचे नाव आहे. संचित रजा मंजूर केली नाही म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. कैद्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे....

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात राज्यभरातील कैदी आहेत. अविनाश अशोक जाधव (30) हा काही महिन्यांपासून कारागृहात आहे. जाधव याला यापूर्वी संचित रजा मंजूर झाली होती.

ती मिळाल्यावर तो घरी गेला. मात्र, रजा संपल्यावर तो स्वतःहून कारागृहात हजर झाला नव्हता. तेव्हा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून कारागृहात आणण्यात आले होते. त्याला पुन्हा संचित रजा हवी होती. अविनाश जाधवने कारागृह प्रशासनाकडे रितसर अर्ज दाखल केला होता.

मात्र, आधी रजा घेतलेली असल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला होता. तो राग मनाशी बाळगून अविनाश जाधव याने बुधवारी मध्यरात्री कारागृहात सॅनिटायझर प्राशन केले. कारागृह कर्मचा-यांनी त्याला त्वरित जिल्हा रुग्णालायात दाखल केले.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कारागृह प्रशासनाकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जाधव विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com