नाशिक । प्रतिनिधी Nashik
चीनसारख्या (China) देशाने सागरी युद्धाचा (sea warfare) दृरदृष्टिकोन ठेवून त्या पध्दतीने आपल्या सैन्यशक्तीला (Military power) बलवान करण्याचे नियोजन केले आहे. भारताने (india) सुध्दा पुढील 2030 चा विचार करून हवाईच्या जोडीला आपल्या सागरीशक्तीला अधिक सक्षम करावे लागेल.
तरच आपण चीनसारख्या राष्ट्रांला चोख प्रत्युत्तर देऊ शकू,असे प्रतिपादन व्हाईस अँडमिरल (Vice Admiral) (निवृत्त) सोनील भोकरे (Sonil Bhokare) यांनी केले. भारतीय नौसेनेच्या (Indian Navy) सर्वच सक्षमतेसाठी संरक्षण विषयातील अर्थसंकल्पातून (Budget) स्वतंत्र तरतूदही करावी लागेल,असेही ते म्हणाले.
धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात (Raosaheb Thorat Hall) घेण्यात आलेल्या डॉ.मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प भोकरे यांनी गुंफले. ‘जीओपॉलिटिक्स इन 2030 एनबीसी वॉरफेअर’ (Geopolitics in 2030 NBC Warfare) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
संस्थेचे नाशिक (nashik) विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे (Chairman Capt. Shripad Naravane) हे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (Maharashtra University of Health Sciences) रजिस्टार डॉ.कालिदास चव्हाण (Registrar Dr. Kalidas Chavan) प्रमुख अतिथी होते.
यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर, नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे, सहकार्यवाह नितीन गर्गे,खजिनदार शीतल देशपांडे, यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते. मिलिंंद वैद्य यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी .रश्मी भोळे,भावना शुक्ल यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. भोसला कॉलेजच्या विद्यार्थींनीनी स्वागतगीत म्हटले. अनिरूध्द हंदीबोल यांनी पद म्हटले. सौ. झेंडे यांनी सूत्रसंचालन केले.