रस्ते,वीज,पाणीप्रश्नांना प्राधान्य देणार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार
रस्ते,वीज,पाणीप्रश्नांना प्राधान्य देणार

निफाड । प्रतिनिधी Niphad

तुमच्या मुलीवर, बहिणीवर तुम्ही जो विश्वास टाकला तो मी सार्थ ठरवणार असून तुमच्या आशीर्वादाने नाशिक जिल्ह्याला हा मंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. ही जन आशीर्वाद अन् जल आशिर्वाद अशी यात्रा चालू असून गावा-गावात करोना लस पोहचली पाहिजे याकडे विशेष लक्ष देणार आहे. हे शेतकर्‍यांचे सरकार असून द्राक्षे, कांदा निर्यातीला (Exports of grapes, onions ) सबसिडीरुपी मदत दिली जात असून रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्याला प्राधान्य (Priority to roads, electricity, water issues ) देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar )यांनी केले आहे.

निफाड येथे शांतीनगर चौफुलीवर जनसंवाद यात्रेचे आगमन होताच भाजप पदाधिकार्‍यांनी डॉ.भारती पवार यांचे स्वागत केले. याप्रसंगी जे.सी.बी.च्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. या यात्रेदरम्यान पावसाचे आगमन झाले. परिणामी या पावसात डॉ.भारती पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. उसाच्या एफआर पीत केंद्र सरकारने प्रती टन 290 रुपये वाढ केली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा आपल्याला होणार आहे.

आतापर्यंत सात हजार कोटींच्या पुढे लसीकरण पुरवठा करण्यात आला असून गावागावांत लस पोहोचली पाहिजे याकडे विशेष लक्ष पुरवणार असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. यावेळी प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुनील बच्छाव, यतिन कदम, जि.प.सदस्य डी.के. जगताप, शंकर वाघ, भागवतबाबा बोरस्ते यांच्यां हस्ते डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर डॉ. पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत तेथील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुनील राठोर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाची व ऑक्सिजन प्लांटची माहिती दिली. प्रसंगी भाजपचे रवी अनासपुरे, अल्पेश पारख, गोविंद खैरनार, गणेश ठाकूर, संजय गाजरे, अरबाज पठाण, नवनाथ धारराव, सुरेखा कुशारे, सारिका डेर्ले, मंजुश्री थोरात, आदेश सानप, सचिन धारराव, विजय शिंदे, गौरव वाघ, नंदू कापसे, बाळासाहेब कुंदे, दीपक गाजरे, साळुंके आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी बंदोबस्त ठेवला.

विंचूरला डॉ. पवारांचे स्वागत

विंचूर। येथील तीनपाटीवर डा:. भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या, मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी व शेतकर्‍यांच्या मालाला बाजारभाव व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com