स्वच्छतेला प्राधान्य द्या : उपायुक्त खैरनार

स्वच्छतेला प्राधान्य द्या : उपायुक्त खैरनार

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राजू खैरनार (Deputy Commissioner Raju Khairnar) यांनी सहाय्यक आयुक्त सचिन महाले (Assistant Commissioner Sachin Mahale), अनिल पारखे, सुनिल खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत रमजान ईद (Ramadan Eid) सण-उत्सवानिमित्त (festival) आढावा बैठक (Review meeting) घेत विभागप्रमुखांना सोयी-सुविधांबाबत आवश्यक सूचना केल्या.

आढावा बैठकीत रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त खैरनार यांनी मनपातील स्वच्छता (Hygiene), पाणीपुरवठा (Water supply), विद्युत (electricity), बांधकाम, अतिक्रमण (Encroachment) व इतर विभागप्रमुखांनी केलेल्या नियोजनाचा प्रशासकीय आढावा घेतला. संबधित विभागप्रमुखांना कामांमध्ये काही समस्या येत असल्यास त्यांनी तातडीने वरिष्ठाना कळवून समस्येचे निवारण करावे.

रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना (muslim community) नमाज पठणासाठी सालाबादाप्रमाणे यावर्षीही लष्कर ईदगाह, कल्लुशाह ईदगाह, ईमाम अहमद रजा ईदगाह, सैय्यद इजहार अशरफ ईदगाह, छोटी (कुंभारवाडा) ईदगाह, खलिल हायस्कुल ईदगाह, बहेतूउलम ईदगाह, तजवीजूल कुराण ईदगाह, मुफ्ती आजम ईदगाह, मिल्लत मदरसा ईदगाह,

भिकन शाह ईदगाह, सनाउल्लानगर ईदगाह अशा एकुण 12 ईदगाह मैदानांचे नियोजन करण्यात आले आहे. सदर ईदगाह मैदांनाची वार्ड स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या अधिनस्त स्वच्छता कर्मचार्‍यांकडून साफसफाई करून घ्यावी, शहरातील रस्ते (road), गटारी (Gutters) व नाल्यांची साफसफाई तसेच नमाज पठणाच्या दिवशी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरातील कचरा नियमितपणे उचलण्यात यावा.

पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) सण-उत्सव कालावधीत दैनंदिन पाणीपुरवठा नियमितपणे सुरू ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) ईदगाह मैदानांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मलेरीया विभागाने नियमीत फवारणी करावी. विद्युत विभागाने प्रमुख मार्गावरील पथदीप सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी तसेच शहरातील सर्व पथदिप सुरळीत सुरू ठेवावेत. उद्यान विभागाने ईदगाह मैदाने व प्रार्थनास्थळांच्या परिसरातील गवत, झुडपे काढून त्वरीत साफसफाई करावी आदी निर्देश यावेळी देण्यात येऊन विभागप्रमुखांवर कामांच्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या.

बैठकीस उपअभियंता एस.टी. चौरे, प्रभाग अभियंता मंगेश गंवादे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहम्मद, उमेश सोनवणे, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, शहर समन्वयक अक्षय थोरात, स्वच्छता निरीक्षक गोकुळ बिर्‍हाडे, प्रेम शिंदे, अमित सोदे, संदीप कापडे, मनिष कापडे, शाम सोनवणे, ईसा बेग, विकास वाल्हे, सुनिल गंगावणे, मनिष ठाकरे, निशांत संसारे, कपिल परदेशी, शेख मजहर, नदिम हमजा, कलिम सैय्यद, विकी देवरे, आकाश केदारे, सागर शेजवळ, सनद देवरे, कुंदन पवार, लिपीक दिलीप मोरे, योगेश नेरकर व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com