नाशिक | Nashik

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीच्या शिवजयंती मिरवणुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. यापुढे भविष्यात कोणत्याही प्रकारचा माेर्चा, मिरवणुका, आंदोलन किंवा गर्दी होतील अशा काेणत्याही कारणासाठी कार्यक्रम घेण्यासाठी पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि.१९) शिवजयंतीनिमित्त शहर सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी जय्यत तयारी झाली असून अनेकांनी देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आहेत. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच मिरवणुकीवरही बंदी घातली आहे. पोलीस आयुक्त दिपक पाण्डे्य यांनी देखील गर्दी होऊ नये यासाठी नियोजन केले असून पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही मिरवणुकीस बंदी घातली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, जनतेस कोणत्याही प्रकारची अडचण, गैरसोय, त्रास, धोका किंवा नुकसान होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी शहरात पूर्वपरवानगी शिवाय मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे आंदोलन, शोभा यात्रा, दिंडी, रास्ता रोको, क्रीडा स्पर्धा आदींना बंदी घातली आहे. तसेच परवानगी साठी संबंधितांना पोलीस आयुक्तांकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे.