अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद

अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील नोटप्रेस (Note Press) व आयएसपी प्रेसच्या (ISP Press) कामगारांनी विविध मागण्यांसाठी उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. यामुळे अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद राहणार आहे...

मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे (Jagdish Godse), कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे (Dnyaneshwar Jundre), स्टाफ युनियनचे सरचिटणीस अभिजित आहेर (Abhijit Aher), कार्याध्यक्ष दिपक शर्मा (Deepak Sharma), एससीएसटी असोसिएशनचे सरचिटणीस सिध्दार्थ पवार (Siddharth Pawar), कार्याध्यक्ष विकास बर्वे (Vikas Barve) यांनी ही माहिती दिली.

हा मुद्दा दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांकडे उपस्थित करणार असल्याचे भाजपचे (BJP)पदाधिकारी राजेश आढाव (Rajesh Adhav) यांनी कामगारांशी चर्चेनंतर सांगितले.

प्रेसमध्ये आयएसपी मजदूर संघ ही कामगारांची मान्यताप्राप्त संघटना आहे. कामगारांसाठी स्टाफ युनियन (Staff Union) आहे. यापूर्वी संघटनांशी चर्चा करूनच व्यवस्थापन निर्णयांची अंमलबजावणी करत असे. प्रेसमधील मशिनरी जुन्या झाल्यामुळे उत्पादन घटले आहे.

त्यातच कामगार संख्या कमी होत आहे. नोट प्रेसमधील साडेतीन हजारांवरील कामगारांची संख्या एक हजार झाली आहे. तरीदेखील संघटनांनी कामगारांना प्रोत्साहन देऊन उत्पादन कमी होऊ दिलेले नाही.

कामगारांना ओव्हरटाईम, इन्सेन्टिव्ह, टार्गेट अलाऊन्स, स्टॅगर लंच मिळवून दिले. व्यवस्थापन व संघटनांमधील सुसंवादामुळे प्रेसमधील शांतता व सलोखा कायम होता.

अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद
देशदूतचा ५२ वा वर्धापन दिन : उद्योगाच्या वाटा (इंडस्ट्री), काल आज आणि उद्या

नोट प्रेसमध्ये मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू यांची नुकतीच नियुक्ती झाली आणि चित्र बदलले. चर्चा करून कामगार संबंधित निर्णय घ्यावे, अशी विनंती संघटनांनी त्यांना केली. मात्र, जुनी मशिनरी, खराब कच्चा माल हे दोष दूर न करता कामगारांना जास्त उत्पादनाचे लक्ष्य दिले जात आहे.

रोज नवीन आदेश देण्यात येतात. जादा काम करूनही इन्सेटिव्हचे पैसे दिले जात नाही. मोबदल्याशिवाय जादा वेळ थांबवून काम करण्याचे आदेश दिले जातात. अशा कारणांमुळे कामगार तणावाखाली असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

कामगार हिताला बाधा येणार नाही असा करार संघटना व सरकार दरम्यान महामंडळ होताना झाला असतानाही कामगार हिताला धक्का लावला जात आहे. या दडपशाहीमुळे प्रेसमधील शांतता धोक्यात आली आहे. व्यवस्थापनाने मनमानी सुरु ठेवल्याने कामगार भयभीत झाला आहे.

आयएसपी मजदूर संघाने नोट प्रेस व्यवस्थापनाला निवेदन देऊन पारंपारिक पध्दतीने काम सुरु ठेवण्याची मागणी केली होती. कार्पोरेशन होतानाचा करार पाळला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला होता. तरीही व्यवस्थापनाची दडपशाही सुरुच आहे.

अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद
देशदूतचा ५२ वा वर्धापन दिन : नाशिकचे ऑटोमोबाईल क्षेत्र, काल आज आणि उद्या

पाच लाखांच्या नोट गहाळ प्रकरणी निलंबित कामगारांना त्वरित कामावर घ्यावे ही मागणी दुर्लक्षली आहे. ज्या कामात कामगार पारंगत आहे ते सोडून दुसरेच काम करण्यास सांगितले जात आहे.

या सर्व कारणांमुळे संयम संपल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी मायनारीटीज असोसिएशन आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com