पंंतप्रधान मोदी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी साधणार संवाद

गुरुवारी सकाळी ११ वाजता : जिल्हाप्रशासन लागले कामाला
पंंतप्रधान मोदी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी साधणार संवाद

नाशिक । Nashik

करोनाचा वाढता संसर्ग बघता देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे अशा ५६ जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांशी पंतप्रधान नरेंद्र

मोदी संवाद साधणार आहेत.यात महाराष्ट्रातील नाशिकसह १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. गुरुवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी आॅनलाईन पध्दतिने संवाद साधणार आहे. या माध्यमातून ते जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

देशातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंताजनक असून दिवसाला तीन ते चार लाख इतके पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. पंतप्रधान मोदी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असून परिस्थितीचा घेत उपाययोजनांची माहिती घेत आहे. त्याचा पुढिल टप्पा म्हणजे पंतप्रधान मोदी अॅक्टिव्ह रुग्ण जादा असलेल्या राज्यातिल मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्रासह केरळ, प. बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा,छत्तीसगढ, झारखंड आणि ओडीसा या राज्यातील ५६ जिल्हाधिकार्‍यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहे. हा आढावा घेताना कोरोनाशिवाय आणखी काही विषय चर्चेला येणार काय,याची सध्यातरी जिल्हाधिकार्‍यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस, तिसर्‍या लाटेची तयारी,सध्याची रुग्ण संख्या,होत असलेले उपचार,भविष्यातील अडचणी,लहाण मुलांच्या बेडची व्यवस्था यासह इतर विषय हाताळण्याची शक्यता गृहीत धरुन संबंधित विषयाचे अहवाल तयार करण्याची मोहीम गतिमान केली असल्याचे जिल्हाप्रशासनाने सांगितले. दरम्यान या बैठकीला मोदींसोबत निती आयोगाचे सदस्य व त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थितीत राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी येत्या गुरुवारी आॅनलाईन संवाद साधणार आहे. नेमके कोणत्या मुद्यांच्या आढावा घेतील यावर भाष्य करणं अवघड आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com