लाचखोर प्रकरणातील प्राथमिक शिक्षक निलंबित

लाचखोर प्रकरणातील प्राथमिक शिक्षक निलंबित
USER

नाशिक | Nashik

माध्यमिक शिक्षणाधिकारी (Education Officer Dr.Vaishali Zankar) डॉ. वैशाली वीर झनकर यांचा साथीदार शिक्षक पंकज दशपुते यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी हे आदेश काढले आहेत.

गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. याच प्रकरणी ९ लाखांची लाच घेतल्या प्रकरणी सहभागी असलेला जिल्हा परिषदेचा (Zilla Parishad Teacher) शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (CEO Leena Bansod) यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेचा (Zilla parishad) शिक्षक पंकज रमेश दशपुते हा नाशिक तालुक्यातील राजेवाडी शाळेवर प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले व दशपुते यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. नंतर येवले व दशपुते यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. नंतर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या फरार झाल्या होत्या. त्यानंतर त्या एसीबी समोर हजर झाल्या. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दशपुते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत बनसोड यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com