नाशिक । Nashik

एन.डी. पटेल रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मिळून महिला दिन अतिशय उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.माधुरी किर्लोस्कर, मेडिसिन विभाग प्रमुख, डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नाशिक व अध्यक्ष स्थानी नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील उपस्थित होते.

डॉ. माधुरी किर्लोस्कर यांनी महिलांचे आरोग्य आणि कोव्हिड-१९ संबंधित लस घेण्याचे फायदे , मास्क वापरणे गरजेचे, वारंवार हात धुणे, दोन व्यक्ती मधील अंतर, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम टाळणे, अशा अनेक विषयांवर भर देऊन सर्वांना सखोल आणि अनमोल मार्गदर्शन केले. विभाग नियंत्रक पाटील यांनी महिलांनी घर आणि नोकरी सांभाळताना दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःचे आरोग्य देखील सांभाळावे याबाबत मार्गदर्शन केले.

सर्व महिला कर्मचारी भगिनींनी करोना कालावधीचे नियम पाळून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, कामगार अधिकारी जहाँ आरा शेख,शारदा ढिकले, सोनाली पाटील, चैताली भुसारे, सुवर्णा कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व भगिनींनी विविध कार्यक्रम आयोजित करून पार पाडला. त्याचबरोबर नाशिक आगारात देखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे यांनी महिलांना कामासंबंधी मार्गदर्शन केले.

आणि नलावडे आणि सहायक कार्यशाळा अधिक्षक स्वप्नील उफाडे यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि बॉलपेनाचे वाटप करण्यात आले.