
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Nashik Agricultural Produce Market Committee) जिल्ह्यात विविध बाजार समित्यांवर
सध्या पालेभाज्यांची (vegetables) आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात या पालेभाज्यांची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
कोथिंबीर जुडीला एक रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने (farmers) विक्री न करता रस्त्यावर जाणाऱ्या ग्राहकांना फुकट वाटप करत आपला संताप व्यक्त केला. कोबीला दीड ते दोन रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे औषधाचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकरीही मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
नाशिक बाजार आवारात शुक्रवारी (दि. २४) एक किलो वजनाची कोथिंबीर जुडी १ रुपयाला लिलावात पुकारली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कोथिंबीरिची विक्री न करता रस्त्यावर जाणाऱ्या ग्राहकांना फुकट वाटप करत आपला संताप व्यक्त केला. लिलाव करण्यासाठी भाजीपाला खाली करायचा आणि लिलाव झाल्यानंतर तो पुन्हा भरायचा, हे परवडत नाही, त्यामुळे भीक मागितल्यासारखी परिस्थिती शेतकऱयांवर आली आहे.
बाजारात आणलेलया भाजीपाल्याला भाव (Vegetable prices) नाही. त्यातच व्यापारी लिलाव झाल्यानंतर वांधा काढतात. त्यामुळे कोथिंबीर अवघा १ रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे काढणी व वाहतूक परवडत नाही.त्यामुळे शेतकऱयांमध्ये तीव्र नाराजी आहे.