मागोवा : जुलै अपवाद; गॅसकीट, शॉर्टसर्किटमुळे घटनेत वाढ

मागोवा : जुलै अपवाद; गॅसकीट, शॉर्टसर्किटमुळे घटनेत वाढ

नाशिक | अशोक निसाळ Nashik

2022 या वर्षाला निरोप देताना हे वर्ष धावत्या वाहनांना आगीच्या दुर्घटनांच्या अर्धशतकाचे वर्ष ठरले. वाहनांमधील विविध दोषामुळे (Due to various defects in vehicles )घटना घडत असल्याची माहिती समोर यात समोर आली. शिवाय जळीत वाहनांमध्ये बॅटरी, सीएनजी, एलपीजी गॅस किट समस्यांमुळे घटना घडल्याचे समोर आले आहे. अपघातामुळेदेखील वाहन जळण्याच्या घटना घडत आहे. वर्षभरात मुंबई- आग्रा रोड, मुंबई नाका, द्वारका चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, औरंगाबाद रोड, दिंडोरी अशा विविध ठिकाणी धावत्या 51 वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

जानेवारी 2022मध्ये तब्बल सात घटना घडल्या होत्या. तर नोव्हेंबरमध्ये एकाच दिवशी चार घटना घडल्या होत्या. पहिली आगीची घटना औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर टँकर आणि खासगी बसमध्ये अपघात झाला. त्यात बसने पेट घेतल्याने बस जळून खाक झाली होती. यामध्ये 12 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. दुसरी आगीची घटना नाशिकहून सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेसाठी जाणार्‍या राज्य शासनाच्या बसने पेट घेतला होता. आगीचा भडका होताच प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, बस पूर्णतः जळून खाक झाली होती.

तिसरी आगीची घटना मालेगाव-मनमाड रस्त्यावर असलेल्या कानडगाव शिवारात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणार्‍या वाहनाने पेट घेतला होता. आगीने रुद्र रूप धारण करताच सिलेंडरने स्फोट घेतला. वाहनातील सिलेंडरने स्फोट घेतल्याने अनेक सिलेंडर जवळपास 20 टे 25 फुट हवेत उडाले होते. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही.अग्नितांडवात वाहन पूर्णतः जळून खाक झाले होते. चौथी आगीची घटना पिंपळगाव बसवंत येथे नाशिकच्या दिशेने जाणार्‍या ट्रकने पेट घेतला होता. मालवाहतूक ट्रक असल्याने मोठे नुकसान झाले होते. या घटनेतही सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 30 डिसेंबरला पुणे -इंदौर मार्गांवर उत्तर प्रदेशातील 8 भाविक प्रवाशांना घेऊन जाणार्‍या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनला अचानक आग लागली होती. मात्र संपूर्ण गाडी आणि त्यातील प्रवाशांचे समान जळून खाक झाले होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

याप्रकारे गतवर्षात वाहनांना आग लागण्याचे सर्वाधिक प्रकार घडले. मात्र नववर्षात अशा घटना घडू नये, याची काळजी वाहनचालकाने घेणे गरजेचे आहे.

हे करा

* वेळोवेळी वाहनांचा मेन्टेनन्स करावा.

*तज्ञांकडून ट्रायल घ्यावी.

*कंपन्यांनी पुन्हा तज्ञांकडून तपासणी करावी.

* वेळोवेळी कूलरची तपासणी करण्यात यावी.

* अनधिकृत गॅस फिटिंग किट किंवा सीएनजी किटवर बंदी आणावी.

* रेडिएटरमधील पाण्याची तपासणी करावी.

महिना - घटना

जानेवारी 7

फेब्रुवारी. 2

मार्च 7

एप्रिल 9

मे 6

जून 1

जुलै -

ऑगस्ट 1

सप्टेंबर 5

ऑक्टोबर 4

नोव्हेंबर 5

डिसेंबर 4

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com