नाशिकच्या चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक
नाशिक

नाशिकच्या चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक

निरिक्षक कोल्हेंसह चौघांचा सामावेश

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष भूमिका बजावणार्‍या पोलीस अधिकारी वकर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदेके जाहिर होतात. यामध्ये नाशिकच्या 4 अधिकार्‍यांचा सामावेश आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. कोल्हे यांच्यासह नागरी हक्क संरक्षण कार्यालय येथील दोघांचा सामावेश आहे.

केंद्र गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि.14) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 अधिकार्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, 14 पोलीस शौर्य पदक व 39 जणांना प्रशंसनीय सेवेकरिता पोलीस पदक जाहीर झाले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, नाशिक परिक्षेत्राच नागरी हक्क संरक्षण कार्यालय येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम वेताळ व पांडुरंग कावळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम शंकर कोल्हे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ते मूळचे लोणी हवेली (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथील आहेत. डॉ. कोल्हे यांना 28 वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत सुमारे 600 बक्षिसे, 85 प्रशंसापत्रे मिळाली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. डॉ. कोल्हे यांनी खून, दरोडे, आर्थिक घोटाळ्यांचे क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यांचे तपास उत्कृष्टरित्या केले आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे यांनी नाशकातील मुथुट फायनान्स येथे पडलेल्या धाडसी दरोड्याचा काहीही पुरावा नसताना छडा लावला आहे. नागरी हक्क संरक्षण कार्यालय नाशिक परिक्षेत्र येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम गणपत वेताळ यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ते मूळचे पाटणे (ता.मालेगाव, जि.नाशिक) येथील आहेत. यापुर्वी ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाचक शाखेत कार्यरत होते.

पांडुरंग बाबुराव कावळे हे 1988 ला ग्रामिण पोलीस दलात भरती झाले आहेत. यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा दिली असून किचकट गुन्ह्यांच्या उकल त्यांनी केली आहे. यासाठी त्यांना आतापर्यंत 261 बक्षिसे व 4 प्रशंसा पत्रके मिळाली आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com