वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; घरांच्या छतावरील पत्रे उडाले

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; घरांच्या छतावरील पत्रे उडाले

दहिवड | मनोज वैद्य Dahivd

देवळा तालुक्यातील ( Deola Taluka ) दहिवड ( Dahivad ) येथे आज बुधवार दिनांक 1 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने ( Rain) हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून या वादळी वाऱ्याने ( Storm Wind) काही घरांच्या छतावरील पत्रे देखील उडाले आहेत.

गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला असून मोठ्या प्रमाणात उकाड्याचे व उन्हाचे प्रमाणही वाढल्याने जनता हैराण झाली आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहणार असून मोसम देखील अरबी समुद्रातून हळूहळू पुढे पुढे सरकत आहे.

रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकरी सुखावला आहे.

दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे दहिवड येथील माकोणे शिवारातील शेत गट नंबर 949 मध्ये वास्तव्यास असलेल्या सुपडू रंभाजी महिरे यांच्या घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार उपयोगी साहित्य भिजून खराब झाले, वादळ इतके जोरात होते की घरावरील पत्रे साधारण 50 फूट लांब उडून गेल्याचे पाहायला मिळाले. सदर नुकसान घटनेचा प्रशासनाने पंचनामा करण्याची मागणी प्रहारचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर व नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com