नाशकात पावसाची हजेरी; गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

नाशकात पावसाची हजेरी; गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात गणेश भक्तांचा उत्साहाला उधान आले असतानाच नाशिकमध्ये मात्र मुसळधार पावसाने ( Rain )हजेरी लावली.त्यामुळे उत्साहावर पाणी फेरले जात आहे.

अखेरचे दोन दिवस शिल्लक राहील्याने सर्व देखावे खुले झाले आहे. आरती महाप्रसादासह सांस्कृतीक कार्यक्रमांची प्रचंड रेलचेल सुरु आहे.गणेश मंडळांनी महत प्रयासाने साकारलेले देखावे पाहण्यासाठी दोन वर्षानंतर संधी मिळाल्याने नागरिकांची गर्दी उसळत असतानाच ऐन दर्शनाच्या वेळीच पावसाने हजेरी लावली.

यंदा सिन्नर येथे ढगफुटी सदृष्य पावसा मुळे गणेशोत्सवाचा आनंद हिरावला गेला. नाशिक मध्ये गणेश उत्सवाच्या ( Ganesh Festival ) सुरवातीस पाऊस झाल्यानंतर नंतर थांबला होता. मात्र काल पुन्हा पावसानी हजेरी लावली तसेच आज संध्याकाळी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com