नाशिक । Nashik

नववर्षांच्या स्वागतासाठी शहरातील विविध हॉटेल्स व रिसॉर्टस् व्यावसायिक सज्ज झाले आहेत. डीजेच्या संगीतावर खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नववर्षांचे स्वागत करण्याची तयारी तरूणाईनेही सुरू केली आहे.

परंतु यंदाच्या थर्टिफस्टवर करोनाचे गडद सावट आहे. नवी लाट येण्याची शक्यता असल्याने हॉटेल्स तसेच पार्ट्यांना परवानगी मिळण्यावर टांगती तलवार असणार आहे.

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तरुणाई अधिक जोशात आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी हॉटेल्स व रिसॉर्टस्मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वर्षांनिमित्त युवकांचा होणारा हैदोस रोखण्यासाठी काही सामाजिक संघटना प्रयत्न करीत असल्या तरी युवक युवती नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करीत असतात. कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतीसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरेटमध्ये व्यवस्था करण्यात येते. नववर्षांचे स्वागत करण्याचा तरुणाईमध्ये उत्साह आहे. त्यामुळे बहुंताश हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांना प्रवेशाची सोय करण्यात येणार आहेत.