‘त्या’ सेवकांना हटवण्याची तयारी

जि. प. प्रशासनाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू
‘त्या’ सेवकांना हटवण्याची तयारी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद मुख्यालयात (Zilha Parishad Headquarter) वर्षोनवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडलेल्या सेवकांना हटविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. एकाच टेबलावर तीन वर्षापेक्षा अधिक तसेच एका विभागात पाच वर्षाहुन अधिक काळ झालेल्या सेवकांच्या बदल्या करण्यात येणार आहे. माहिती गोळा झाल्यानंतर साधारण महिनाभरात अतंर्गत बदल्या (transfer) केल्या जातील, असे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवरील (Deputation) सेवकांचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असताना मुख्यालयातील वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या सेवकांना हटविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department) विभागनिहाय माहिती जमा केली जात आहे. पुढील वर्षात ही कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेतील मुख्यालयात अनेक विभागात मलईदार टेबलावर वर्षोनवर्ष सेवक ठाण मांडून आहेत. दर तीन वर्षांनी बदली होऊन देखील हे सेवक टेबल सोडत नसल्याचे दिसून आले आहे. एकाच टेबलावर अन विभागात असल्याने या सेवकांची मोनोपॉली झाली आहे. या सेवकांनी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुखांनाही आपल्या मर्जीत करून घेतले आहे. त्यामुळेच वेळोवेळी या सेवकांची पाठराखण केली जाते. त्यांचा टेबल हलविण्याचा प्रयत्न झाल्यास तो, हाणून पाडला जातो.

अतंर्गत बदल्यांबाबत सर्वसाधारण सभेत, स्थायी समिती सभेत (Standing Committee meeting) भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे (BJP group leader Dr. Atmaram Kumbharde), सिध्दार्थ वनारसे, सभापती संजय बनकर, सविता पवार आदींनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले. प्रत्येकवेळी प्रशासनाकडून वेळकाढूपणा झाला. मात्र, दोन महिन्यांपासून प्रतिनियुक्ती सेवकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावरून प्रशासन व सदस्यांमध्ये घमासान सुरू आहे.

यातच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अतंर्गत बदल्यांच्या प्रश्न उपस्थित करण्याची तयारी केली होती. सभा तहकूब झाल्याने हे प्रश्न उपस्थित झाले नाहीत. मात्र, प्रश्न उपस्थित होणार असल्याने प्रशासनानेच अतंर्गत बदल्यांची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागनिहाय माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com