'त्या' शाळांचा लेखापरीक्षण अहवाल तयार करा

'त्या' शाळांचा लेखापरीक्षण अहवाल तयार करा

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शिक्षण उपसंचालकांना सूचना

नाशिकरोड । प्रतिनिधी ( Nashikroad )

जिल्ह्यातील खाजगी शाळांमध्ये( Private Schools )पालकांकडून वर्ग सुरू नसताना लॉकडाऊन काळातील फी ( Fees )सक्तीने वसूल केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन मंत्री बच्चू कडू ( Minister of State for School Education Bachchu Kadu.) यांनी शिक्षण उपसंचालक यांना संबंधित शाळेचा लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भात पालकांच्या तक्रार निवारणासाठी पाच समित्यांची स्थापना करावी, असे त्यांनी सांगितले.

येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात बच्चू कडू यांनी बैठक घेतली होती. आम आदमी पार्टीने काही दिवसांपूर्वी शाळेतील अवास्तव फी वसुली संदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले होते. मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. अशी तक्रार आम आदमी पार्टीने केली होती.

तसेच यासंदर्भात निवेदन देखील दिले होते. त्याची दखल घेत कडू यांनी खाजगी शाळा व्यवस्थापन आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी तसेच पालकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. याप्रसंगी अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, अ‍ॅड. बंडूनाना डांगे, अनिल कोशिक, अल्ताफ शेख, जगमेरसिंग खालसा आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com