नाशकात 'बकरी ईद'ची तयारी

नाशकात 'बकरी ईद'ची तयारी

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

इस्लाम धर्माचे जेष्ठ धर्मगुरू हजरत इब्राहिम अलेहसलाम व हजरत इस्माईल अलेहसलाम यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ तसेच अल्लाहोताआलाच्या मार्गात त्याग व बलिदानाची शिकवण देणारा पवित्र ईद-उल-आजहा’ अर्थात बकरी ईदचा (Eid) सण पुढच्या आठवड्यात मुस्लिम (Muslim) बांधव साजरी करणार आहेत...

यंदा लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर (Idgah Maidan) तसेच सार्वजनिक ठिकाणी ईदची नमाज होणार नाही. त्याचप्रमाणे कुर्बानीची तयारी मुस्लिम बांधवांनी सुरू केली आहे.

दरम्यान मुंबईहून (Mumbai) चंद्र दर्शनाची शहादत मिळाल्याने 21 जुलै बुधवारी पवित्र ईदचा सण साजरी होणार आहे. भाविकांनी केंद्र तसेच राज्य शासनाच्या (State government) निर्देशांचे पालन करीत ईदचा सण साजरा करावा असे, आवाहन खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामोद्दीन अशरफी (Khatib-e-Nashik Hafiz Hisamuddin Ashrafi) यांनी केले आहे.

यंदाही जिवंत बोकड किलोप्रमाणे मिळत असल्यामुळे भाविकांची एक प्रकारे चांगली सोय झाली आहे. नाशिक शहर (Nashik city) परिसरात ठिकठिकाणी बोकडांचे बाजार भरले आहे. केकेके ग्रुपच्या एसकेके फार्ममध्ये देखील मोठ्या प्रमाणात जनावरे कुर्बानीसाठी विक्रीस आले आहे.

या ठिकाणी 60 किलो पासून सुमारे दीडशे किलो पर्यंतचे बोकडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती संचालक फखर कोकणी (Fakhar Konkani) यांनी दिली. यात सोजत, तोतापुरी, मालवा, शिरोली, अजमेरा, कोटा तसेच बरबरा जातीचे बोकडांचा समावेश आहे.

नाशिकमधील भाविकांना मोठ्या तसेच जास्त वजनाच्या बोकडांची खरेदी करण्यासाठी दरवर्षी इतर राज्यात जावे लागायचे, यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. भाविकांच्या सोयीसाठी सुमारे आठ जातींच्या बोकड आम्ही नाशिकमध्ये उपलब्ध करून दिले आहे यामुळे भाविकांची सोय होईल,असे कोकणी यांनी सांगितले.

- फखर कोकणी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com