अशोकस्तंभाची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रामवाडीत समांतर पूलाची तयारी सूरू

अशोकस्तंभाची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रामवाडीत समांतर पूलाची तयारी सूरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) अवघा पाच वर्षांवर येऊन ठेपला असून, महापालिकेने (municipal corporation) त्याचे नियोजन सुरू केले आहे.

पंचवटी (panchavati) ते मुख्य शहराला जोडणार्‍या रामवाडी पुलावर वाहनांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतूक कोंडी (traffic jam) सोडविण्यासाठी महापालिका जुन्या पुलाला (old bridge) समांतर पूल उभारण्याची तयारी सूरू केली असून त्याबाबतच्या प्राथमिक आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिक शहरासाठी विकासाची पर्वणी घेऊन येतो.

सिंहस्थाला पाच वर्षांचा अवधी असला तरी आतापासून दळणवळण व पायाभूत सुविधांवर नियोजन केले जात आहे. कुठेही वाहतूक कोंडीची (traffic jam) समस्या उद्भवू नये, याकरिताही रामवाडी उपाययोजनांचे नियोजन केले जात आहेत. रामवाडीच्या या नव्या पूलामुळे कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. अशोकस्तंभ येथील पशुसंवर्धन कार्यालयाजवळील तिवारी महल ते रामवाडी असा हा नवा पूल राहणार आहे.

सिंहस्थात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करताना जुन्या पुलावर येणारा ताण यामुळे कमी होऊ शकतो. तसेच अशोकस्तंभावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी समांतर पुल महात्वाचा पर्याय ठरु शकतो. बारा मिटरचा पूल या नवीन पूलासाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च आपेक्षित धरण्यात आला आहे. या पूलाची रुंदी बारा मीटर राहणार आहे. दोन्ही बाजूला पादचारी मार्ग असेल. यापूलामुळे त्यावर एकेरी वाहतूक करणे शक्य होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com