महिला महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

महिला महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव येथील पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात (women's college) गुणवत्ता सिद्धता मूल्यांकन कक्ष (quality efficiency assessment room) व क्रीडा विभाग (department of sports) आयोजित सात दिवसीय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण (police pre-recruitment training) कार्यशाळेचे (workshop) नुकतीच संपन्न झाली.

म. गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संस्थेचे समन्वयक डॉ. अपुर्व हिरे (Dr. Apurva Hirey), संपदा हिरे यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयातील पोलीस क्षेत्राकडे कल असलेल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी सात दिवसीय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची रूपरेषा पोलीस क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीद्वारे तयार करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन औरंगाबाद (Aurangabad) येथील महिला पोलीस अधिकारी श्रद्धा वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी मार्गदर्शन करतांना वायदंडे यांनी विद्यार्थीनींना पोलीस विभागाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या खात्यावर व वर्दीवर विश्वास असेल तरच आपण या क्षेत्राला व समाजातील अडचणींना योग्यतेने न्याय देऊ शकतो. विद्यार्थिनींनी केवळ नोकरी म्हणून पोलीस खाते स्वीकारणे हे योग्य नसून समाजातील अडीअडचणींना सोडविण्यातच जीवनाची खरी परीक्षा असल्याचे त्यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ. देवरे यांनी विद्यार्थिनींनी पोलीस क्षेत्र निवडताना सामाजिक बांधिलकीचे सातत्याने भान ठेवावे. या क्षेत्रात बर्‍याचवेळा आपल्या भावना बाजूला ठेवून निडरपणे नेतृत्व करणे गरजेचे असते. विविध मुद्यांवर विद्यार्थ्यांना (Students) मोलाचे मार्गदर्शन करतांनाच या प्रशिक्षणाचा फायदा केवळ महिला महाविद्यालयापुरताच न राहता मालेगाव शहर व ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांना व्हावा असा मानसदेखील त्यांनी व्यक्त केला.

या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. डी.जी. जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. डी.ए. पवार, गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक डॉ. दीपांजली बोरसे व क्रीडा संचालिका डॉ. लहानू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सात दिवशीय कार्यशाळेस नाशिक (nashik) येथील अश्वमेध करिअर अकादमीचे संचालक प्रा. मनीष बोरस्ते व त्यांचे सहाय्यक पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले नियोजन अभ्यासक्रम,

लेखी परीक्षा, मैदानी स्पर्धा परीक्षा, शासनाचे वेळोवेळी बदल झालेले नियम, पूर्वतयारी अशा विविध विषयातील तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत इतर महाविद्यालयातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. जयमाला सोदे यांनी तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीना पाटील यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com