'ईद-उल-फित्र' निमित्त नमाज पठाण सुरू

'ईद-उल-फित्र' निमित्त नमाज पठाण सुरू

जुने नाशिक । Nashik

पवित्र रमजान महिन्याचे तीस रोजे झाल्यावर आज (दि.14) मुस्लिम समाज "ईद-उल-फित्र'चा मोठा सण साजरा करत आहे. निमित्त पहाटेपासून मुस्लिम बांधवांच्या घरोघरी तसेच निवडक लोकांमध्ये मशिदीमध्ये नमाज पठण सुरू आहे.

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या धार्मिक कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे घरोघरी ईद निमित्ताने नमाज पठाण होत आहे, तर सण उत्साहात साजरी होत आहे. सकाळी बारा वाजेपर्यंत प्रार्थनेचा सिलसिला सुरू राहणार आहे.

नमाज झाल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सोशल डिस्टंसिंग ठेवत ईद मुबारकच्या शुभेच्छा देत आहे. जुने नाशिक तसेच मुस्लिम बहुल भागात चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. दरम्यान पहाटेपासून ईदची लगबग सुरु झाल्यामुळे सर्वत्र शिरखुरम्याचा सुगंध दरवळत आहे.

सुमारे चौदा तासांचे अत्यंत कडक उन्हात मुस्लिम बांधवांनी, भाविकांनी रोजचे ठेवले. यानंतर आलेल्या ईद निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान करोना आपल्या शहर व देशातून हद्दपार व्हावा, सर्वत्र सुख शांती नांदावी यासाठी विशेष प्रार्थना देखील मुस्लिम बांधव करीत आहे. लहान मोठ्यांना सलाम करून आशीर्वाद घेत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com