Nashik : भाजपमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बच्छाव, वाघ यांची नियुक्ती

Nashik : भाजपमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बच्छाव, वाघ यांची नियुक्ती

नाशिक | Nashik

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बदल होतांना दिसत आहेत. काही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी बदलले जात असून प्रत्येक पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता भाजपमध्ये (BJP) देखील मोठे फेरबदल झाले असून गेल्या वर्षभरापासून नाशिक शहराध्यक्षपदासह जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपमध्ये संघटनात्मक बदल झाले असून नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव आणि शंकर वाघ यांची निवड झाली आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी भाजप शहर कार्यकारणीत सलग दोन वेळा संघटन सरचिटणीस म्हणून काम बघितले आहे. तर २०१७ मध्ये त्यांची नाशिक महापालिकेत (Nashik NMC) स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली होती.

दरम्यान, याअगोदर भाजपच्या शहराध्यक्षपदी गिरीश पालवे (Girish Palve)हे कामकाज बघत होते. २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच त्यांचे शहराध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले होते. त्यावेळी गिरीश पालवे यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर पालवे यांना दोन वेळेस मुदतवाढ मिळाली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com