सटाणा बाजार समिती उपसभापतीपदी देवरे
नाशिक

सटाणा बाजार समिती उपसभापतीपदी देवरे

उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Abhay Puntambekar

सटाणा । प्रतिनिधी .

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अजमेर सौंदाणे कृउबा गणाचे संचालक प्रकाश देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसभापती प्रभाकर रौंदळ यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सभापती सुनिता देवरे यांच्या अध्यक्षतेखाली कृउबा सभागृहात उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

आ. दिलीप बोरसे व माजी जि.प. सदस्य प्रशांत बच्छाव यांच्या सुचनेनुसार सभापतीप्रमाणेच उपसभापतींची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक श्रीधर कोठावदे यांनी प्रकाश देवरे यांच्या नावाची सुचना केली. त्यास संचालक संजय बिरारी यांनी अनुमोदन दिल्याने देवरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. त्यांचा प्रशांत बच्छाव, सभापती सुनिता देवरे, मावळते उपसभापती प्रभाकर रौंदळ, सचिव भास्कर तांबे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमात सटाणा ग्राहक संघाचे नवनिर्वाचित सभापती अरविंद सोनवणे व भाजप जनकल्याणकारी योजना प्रसार-प्रचार अभियानाच्या जिल्हाध्यक्षपदी बिंदू शर्मा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक संजय देवरे, नरेंद्र अहिरे, संजय सोनवणे, सरदारसिंग जाधव, पंकज ठाकरे, जयप्रकाश सोनवणे, केशव मांडवडे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, संदीप साळे, संचालिका रत्नमाला सूर्यवंशी, वेणूबाई माळी, सनपा आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, वीरगांव सरपंच ज्ञानेश्वर देवरे, मुन्ना सूर्यवंशी, सुभाष सोनवणे, किरण अहिरे, मंगेश पवार आदी उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com