नाशिक-मुंबई महामार्गाला कुणी वाली आहे का?; अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा संतप्त सवाल

नाशिक-मुंबई महामार्गाला कुणी वाली आहे का?; अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा संतप्त सवाल

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असताना, चित्रपट संवादलेखक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे...

आज सकाळी प्राजक्त यांनी आपल्या गाडीला अपघात झाल्याची बातमी शेअर केली आहे. या अपघातात (accident) प्राजक्त देशमुख सुखरूप आहेत. त्यांनी रस्त्यावरील अनुभवावरून आपले मत व्यक्त केले आहे. प्राजक्त यांच्या गाडीला अपघात झाला असून ते सुखरुप बचावल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

प्राजक्त देशमुख यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "नाशिक-मुंबई हायवे (Nashik Mumbai Highway) वरुन धावणारे अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला.

थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लावत दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?" या अपघातानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टीचा गहन मुद्दा चर्चेत आला आहे. या ट्वीटच्या माध्यमातून प्राजक्त देशमुख यांनी बेशिस्त वाहतुकीकडे यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com