प्रहार सैनिक कल्याण समितीचा शहिद जवानांच्या कुटुंबाना आधार

प्रहार सैनिक कल्याण समितीचा शहिद जवानांच्या कुटुंबाना आधार

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे | Belgaum Kurhe

शहिद (Martyr) झालेल्या जवानांच्या (Soldiers)कुटुंबाना एक ना अनेक कारणांनी कायमच दुःखाचा डोंगर घेऊन जीवन जगावे लागते. घरातील मुख्य कर्त्या पुरुषांच्या निधनाने जवानांच्या कुटुंबाचा आधारच खुंटून जातो. कुणाच्या मुलाने तर कुणाच्या पतीने देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. तरीही त्यांचे कुटुंब डोळ्यातील अश्रू पुसून अभिमानाने जीवन जगताना दिसतात...

या शहिदांच्या कुटुंबाची व्यथा समजून त्यांना आधार देण्यासाठी प्रहार सैनिक कल्याण समितीचे मदतीचे हात सरसावले आहेत. प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी सैनिक विजय कातोरे (Vijay Katore)व वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रेखा खैरनार (Rekha Khairnar) यांच्या पुढाकारातून कुटुंबाच्या अडचणी समजून घेण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) दहा दिवसांचा दौरा केला.

धुळे, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या (Family)भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे विजय कातोरे यांनी सांगितले.

तर वीरनारी रेखा खैरनार यांचे पती कारगील युध्दात १९९९ साली शहीद झाले. त्यानंतर त्यांनी सन २००९ पासून महाराष्ट्रातील शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्याचे कार्य सुरु केले. त्यांच्या या संस्थेमार्फत शहीद परिवारांना जमीन मिळवून देणे, परिवारातील भांडण मिटविणे तसेच शासकिय योजनांचा लाभ मिळवून देणे आदी कामे हाती घेतले असून अनेक शहीद कुटुंबात येणाऱ्या जमिनीच्या अडचणी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून (District Military Welfare Office) मिळणाऱ्या शासकीय मदतीबद्दल शहीद जवानांच्या कुटुंबाना मार्गदर्शन करण्यात आले.

जानेवारी २०२१ साली सेवानिवृत्त झाल्यापासून शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी काम करत आहे. इगतपुरी तालुक्यातील २९ वर्षापूर्वी शहीद झालेल्या राजेंद्र भले यांचे स्मारक लोकसहभागातून उभारले. सैनिक हा माझा परिवार आहे आणि त्यांच्या सोबत खंबीर पणे उभे राहणे हे माझे परम कर्तव्य आहे.

विजय कातोरे, जिल्हाध्यक्ष प्रहार सैनिक कल्याण संघ तथा माजी सैनिक, वाडीवऱ्हे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com