सावकी ग्रामपंचायत : सत्तेच्या चाव्या 'प्रगती'कडे; अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय

सावकी ग्रामपंचायत :  सत्तेच्या चाव्या 'प्रगती'कडे;  अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय

खामखेडा l वार्ताहर Khamkheda

देवळा तालुक्यातील (deola taluka) सावकी ग्रामपंचायतीच्या (savaki grampanchayat) पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत पुन्हा सत्ता काबीज केली. सलग तिसऱ्यांदा मतदारांनी प्रगती पॅनलला कौल दिला. अकरा पैकी आठ जागांवर प्रगती तर विरोधी परिवर्तन पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले....

सावकी ग्रामपंचायतीची(savaki grampanchayat) सत्ता दहा वर्षांपूर्वी कारभारी पवार आणि अरुण शिवले यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपल्याकडे खेचून आणली होती. यानंतर सत्ताधारी प्रगती पॅनल निवडणुकीला सामोरे जात पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याकडे विजयश्री खेचून आणला.

बापू बोरसे, शेखर बोरसे व सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष धनंजय बोरसे यांच्या परिवर्तन पॅनलने यावेळी सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते.

विरोधी परिवर्तन पॅनलचे प्रभाग एक मधून किसन गायकवाड नऊ, प्रभाग चार मधून धनंजय बोरसे हे अवघ्या सहा व जितेंद्र अहिरे हे दहा मतांनी अशा कमी फरकाने पराभूत झाले.

अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी सलग तीसऱ्यांदा सत्ताधारी गटाच्या हातीच सत्तेची चावी दिली आहे. तर विरोधी पॅनलला तीन जागांवर विजय मिळवता आला.

निवडणूकीचा निकाल जाहीर (result) होताच प्रगती पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार व मते पुढीलप्रमाणे

वॉर्ड क्र. २ मधून : धनाजी गायकवाड (४४५), उशाबाई सोनवणे (३८३), रोहिणी निकम (४०४), वॉर्ड क्र. ३ मधून सरला शिवले (बिनविरोध),सुभाष पवार (२६७), जिजाबाई वाघ (२६४) तर वार्ड क्रं.४ मधून उमेश सोनवणे (२३९), हेमंत पवार (२३७), हे आठ उमेदवार विजयी झाले. प्रगती पॅनलच्या उमेदवार सरला शिवले या वार्ड तीन मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे प्रगती पॅनेलने एक जागा बिनविरोध करत अगोदरच विजयाचे खाते उघडले होते.

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व मते :

वॉर्ड क्र.१ मधून नानाजी गायकवाड (२१३) ,लिलाबाई बोरसे (२२६), वार्ड क्रं.४ मधून कांचन गांगुर्डे (२४९) हे तीन उमेदवार विजयी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com