नगर, जळगाव, धुळे सर्वोत्कृष्ट जिल्हे; ग्रामपंचायतीत नाशिक जिल्ह्याची बाजी

पंतप्रधान आवास योजना पुरस्कार
नगर, जळगाव, धुळे सर्वोत्कृष्ट जिल्हे; ग्रामपंचायतीत नाशिक जिल्ह्याची बाजी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात शंभर दिवसांचे ‘महा आवास अभियान-ग्रामीण' सुरु करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काच्या घरकुलासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी केले आहे....

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘महा आवास अभियान’ (Maha Awas Abhiyan) ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना ‘महा आवास अभियान’ (Maha Awas Abhiyan Rural Award) ग्रामीण पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक प्रकल्प संचालक उज्वला बावके, धुळे प्रकल्प संचालक डी.एम.मोहन, तहसिलदार निफाड शरद घोरपडे, अकोले गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, ग्रामसेवक, सरपंच, सर्व बँकाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन प्राधान्याने भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच गायरन जमीनही सार्वजनिक हितासाठी प्राप्त करुन त्यावरही नागरिकांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात यावी. ग्रामीण भागातील गरजू प्रत्येक नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काम करावे, असे विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त सर्वाचे अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी श्री.गमे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच ‘महा आवास अभियान’ -ग्रामीण मधे उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना विभागीय आयुक्त श्री.गमे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: धुळे जिल्हा

द्वितीय क्रमांक: अहमदनगर जिल्हा

तृतीय क्रमांक: जळगांव जिल्हा

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: ता.अकोले जि. अहमदनगर

द्वितीय क्रमांक: ता.जामखेड, जि.अहमदनगर

तृतीय क्रमांक: ता.मुक्ताईनगर जि.जळगांव

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

प्रथम क्रमांक: ग्रा.प. चिंचवे ता.मालेगांव जि. नाशिक

द्वितीय क्रमांक: ग्रा.प.शेवरे ता.बागलाण, जि.नाशिक

तृतीय क्रमांक: ग्रा.प.देवपाडा, ता.दिंडोरी जि.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वित्तीय संस्थांचा गौरव

प्रथम क्रमांक: बँक ऑफ महाराष्ट्र पुणतांबे, ता.राहाता, जि. अहमदनगर

द्वितीय क्रमांक: जनता सह बँक, येवला, ग्रां.प.शेवरे,ता.येवला जि.नाशिक

तृतीय क्रमांम: बँक ऑफ बडौदा, देवपाडा, ता.दिंडोरी जि.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण शासकीय जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्याचे तहसिलदार

प्रथम क्रमांक: नांदगांव तहसिलदार, ता.नांदगाव जि.नाशिक

द्वितीय क्रमांक: बागलाण तहसिलदार, ता.बागलाण, जि. नाशिक

तृतीय क्रमांक: निफाड तहसिलदार, ता.निफाड, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा

द्वितीय क्रमांक: धुळे जिल्हा

तृतीय क्रमांक: नाशिक जिल्हा

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: ता.मुक्ताईनगर जि. जळगांव

द्वितीय क्रमांक: ता.बोदवड, जि.जळगांव

तृतीय क्रमांक: ता.एंरडोल, जि.जळगांव

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

प्रथम क्रमांक: ग्रा.प. जामठी ता.बागलाण जि. नाशिक

द्वितीय क्रमांक: ग्रा.प.अगुलगांव, ता.येवला, जि.नाशिक

तृतीय क्रमांक: ग्रा.प.बोर्ली, ता.इगतपुरी जि.नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वित्तीय संस्थांचा गौरव

प्रथम क्रमांक: स्टेट बँक ऑफ इंडिया , ठेगोंडा ता. बागलाण, जि. नाशिक

द्वितीय क्रमांक:गुरुकृपा महिला बचत गट साडगाव, ता.नाशिक, जि.नाशिक

तृतीय क्रमांक: बँक ऑफ बडोदा, पाटोदा, ता.येवला, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट शासकीय जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्याचे तहसिलदार

प्रथम क्रमांक: नांदगांव तहसिलदार, ता.नांदगाव जि.नाशिक

द्वितीय क्रमांक: निफाड तहसिलदार, ता.निफाड, जि. नाशिक

तृतीय क्रमांक: बागलाण तहसिलदार, ता.बागलाण, जि. नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com