केव्हीएन नाईक संस्थेच्या सेवक पतसंस्था चेअरमनपदी प्रदीप सांगळे

व्हा. चेअरमनपदी रावसाहेब आव्हाड
केव्हीएन नाईक संस्थेच्या सेवक पतसंस्था चेअरमनपदी प्रदीप सांगळे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या (Krantiveer Vasantrao Narayanrao Naik Shikshan Prasarak Sanstha) सेवकांच्या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी प्रदीप सांगळे (Pradeep Sangale) तर व्हा. चेअरमनपदी रावसाहेब आव्हाड (Raosaheb Awhad) यांची बिनविरोध निवड करण्यात आली....

संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष पी. आर. गिते, सरचिटणीस व नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, सहसरचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त,संचालक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

पतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.५) पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काकड यांच्या उपस्थितीत चेअरमन पदासाठी प्रदिप सांगळे तसेच व्हा. चेअरमन पदासाठी रावसाहेब आव्हाड यांचा एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली.

या पाच वर्षांसाठी संचालक म्हणून प्रदिप सांगळे, एकनाथ भाबड, रवींद्र काकड, केशव आघाव, जयंत धात्रक, रावसाहेब आव्हाड, दिपक इप्पर, राजेंद्र गिते, प्रा. संतोष भैलूमे, महिला प्रतिनिधी म्हणून सुवर्णा नागरे, रोहिणी गामणे यांची निवड करण्यात आली.

सर्व नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि संचालक व संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पतसंस्थेचा कारभार बघत असताना सभासदांचे हित व आर्थिक बचत करून संस्था नावारूपास नेण्याचा प्रयत्न राहील. संस्थेत ठेवी वाढविण्याचा व सभासदांना वेळेवर नियमात कर्ज वाटपाचा प्रयत्न राहील,असे नवनिर्वाचित चेअरमन प्रदिप सांगळे व व्हा. चेअरमन रावसाहेब आव्हाड यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com