नाशिक बाजार समितीच्या उपसभापती पदी प्रभाकर मुळाणे

नाशिक बाजार समितीच्या उपसभापती पदी प्रभाकर मुळाणे

पंचवटी | Panchavti

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रभाकर रामभाऊ मूळाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ताराबाई माळेकर यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. शुक्रवारी (ता.११) सकाळी बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली.

सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी (ता.११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निवडणुक प्रक्रिया पार पडली.

सभापती देविदास पिंगळे यांच्यासह संचालक रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, शाम गावित, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे यांच्या उपस्थितीत बाजार समितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक अर्चना सौदाने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

उपसभापतीपदासाठी प्रभाकर मुळाने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बाजार समिती सचिव अरुण काळे, सहायक सचिव आर. एन. घोलप व एन एल बागुल, मुख्य लिपिक एम ए म निकाळे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com