
दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp
देवळाली मतदार संघातील देवरगाव ( Devrgaon ) परिसरातील वैष्णवनगर (वैसनपाडा) ( Vaishnav Nagar ) येथील ग्रामस्थांनी पन्नास वर्षे अंधारात काढले, आ.सरोज अहिरेंच्या ( MLA Saroj Ahire ) माध्यमातून वीज पुरवठा (Power supply)सुरु झाल्याने नागरिकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
तालुक्यातील देवरगाव हद्दीतील वैष्णवनगर या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षांपासून लोकवस्ती तयार झाली आहे, याठिकाणी वीजेची व्यवस्था नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होत होती, कित्येक वर्षांपासून हा प्रश्न दुर्लक्षित होता, मतदार संघातील इतर विकास कामांबरोबरच या ठिकाणी विजेचा प्रश्न गांभीर्याने घेत आ.सरोज अहिरे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना या भागात वीज पूरवठा सुरु करण्याबाबत सूचना केल्यानंतर आ.अहिरेंच्या हस्ते विजेचा दिवा लावत उद्घाटन करण्यात आले.
आ.अहिरेंच्या माध्यमातून वैष्णवनगर ( वैसनवाडी) येथे वीज पुरवठा करण्याची मागणी पुर्ण झाल्याने नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, राष्ट्रवादीचेजिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुका कार्यध्यक्ष निवृत्ती कापसे, पंचायत समितीचे माजी उप सभापती ढवळू फसाळे, कैलास बेंडकुळे, सरपंच काशिनाथ मोंढे, दिनकर मोंढे, अविनाश कसबे, विशाल गायकर, उपसरपंच प्रकाश मोंढे, मंगळू पिंपळके, लक्ष्मण भोये, सागर पिंपळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.