शेतकर्‍यांना महावितरणचा झटका

शेतकर्‍यांना महावितरणचा झटका

ओझे । वार्ताहर Ozhe

दिंडोरी तालुक्याच्या (Dindori Taluka) पश्चिम भागात महावितरण (MSEDCL) कंपनीने थकीत वीजबिलासाठी अनेक गावातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचा विजपुरवठा ट्रासफार्मर (Agricultural pump power supply transformer) पासून खंडीत केला आहे.

सध्या सर्व ठिकाणी द्राक्षबागेच्या छाटणीला सुरूवात झाली आहे. छाटणीनंतर बागाना विविध प्रकारचे विद्रव्य खते देण्यासाठी कृषीपंप (Agricultural pump) चालू करण्याची आश्यकता असते. महाविततरण कंपनीने हिच संधी साधून कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत (Power outage) केल्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल झाला आहे.

महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांना कृषीपंपामागे दहा हजार रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे. करोनामुळे गेल्या दोन हंगामापासून बळीराजाला द्राक्षपिकामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. दोन वर्षापासून शेतकर्‍यांना द्राक्षातून भांडवल सुध्दा निघत नसताना महावितरण कंपनीने हेतूपुरस्कर शेतकरी वर्गाची अडवणूक चालू केली आहे.

पावसाळी हंगामात जवळ जवळ चारमहीने पाऊस चालू असल्यामुळे या परिसरातील कृषीपंप बंद करतात. तरी महावितरण कंपनी वर्षानुवर्ष बिल काढतच आहे. यांचा विचार केल्यास कृषीपंपधारकावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाकडे पैसे येण्याचा मार्ग नाही.

अनेक शेतकरी ऊसावर तर काही शेतकरी द्राक्ष (Grapes) व टोमॅटो (Tomato) पिकावर पिकावर थोड्याफार प्रमाणात बिल भरण्यास तयार आहे. मात्र सध्या या परिसरात कुठलाही हंगाम चालू नाही. अनेक शेतकर्‍यांच्या टोमॅटो चालू होण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. काही शेतकरी सोयबिन पिकावर (Soybean crop) अवलंबून आहे.

त्यामुळे महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली (Compulsory electricity bill recovery) न करता शेतकर्‍यांकडून दोन हजार, चार हजार शेतकर्‍यांच्या परिस्थिती नुसार वसुली करावी ती पण टोमॅटो, सोयाबिन, ऊस, द्राक्ष पिके चालू झाल्यानंतर अशी मागणी विलास जाधव, जयदिप देशमुख, काका कोंड, संजय बर्डे, सुनिल कोंड, दिपक बर्डे, गणेश कोंड, संदिप कोंड, जगदिश देशमुख, राजेंद्र देशमुख, सुनिल कोंड, बालाजी मोरे, भाऊसाहेब पिंगळ आदी शेतकरी वर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.