इगतपुरी पूर्व भाग तीन दिवसांपासून अंधारात

इगतपुरी पूर्व भाग तीन दिवसांपासून अंधारात

घोटी । वार्ताहर Ghoti

तालुक्याच्या पूर्व भागातील परदेशवाडी ( Pardeshwadi )33 के.व्ही उपकेंद्रा अंतर्गत येणार्‍या तीस गांव वाड्या पाड्यांना तीन दिवसांपासून लाईट ( Power Supply )नसल्याने पिण्याचे पाणी,पिठाच्या गिरण्या बंद झाल्याने जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पावसामुळे आवणीचा जोरात मोसम चालू आहे. त्यात वीज गायब झाल्याने नागरिकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.

टाकेद, खेड, बारशिंगवे सोनोशी शिरेवाडी मायदरा बांबळेवाडी घोडेवाडी,आंबेवाडी, मांजरगाव खडकेद इंदोरे वासाळी,अडसरे बुद्रुक, अधरवड, बेलगांव तर्‍हाळे, पिंपळगाव मोर अशा अनेक गावांना परदेशवाडी 33 के. व्ही उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होतो.

खेड-परदेशवाडी, बारशिंगवे,टाकेद, बेलगांव त-हाळे हे चार फिडर या परिसरासाठी आहेत. व उभाडे येथे समृध्दीच्या खड्डी क्रेशर व विविध यंत्रसामुग्री साठी येथूनच लाईट पुरवठा केला जातो. या सबस्टेशन ला घोटी येथून 45 वर्षापुर्वीची जुनाट विद्युत लाईन वापरात आहे.पुर्वीची भंडारदरा 33 के.व्ही वाहिनी या सबस्टेशन ला जोडली आहे. पोल पडणे,सडलेले पोल बदलणे तारा तुटणे हे कायम चालू आहे.

ग्रामपंचायत चे पाणी तीन दिवसापासून लाईट नसल्याने बंद आहे. नदी नाले यांचे पाणी पिण्यात आल्यास रोगराई वाढू शकते.पीठ गिरण्या बंद आहेत. आमच्या भागात सतत विद्युत पुरवठा खंडित असतो या कड़े संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे.

ताराबाई रतन बांबळे सरपंच टाकेद बु.

गेल्या तीन चार दिवसांपासून सर्व वीज वितरण कर्मचारी रात्रंदिवस जोरदार वार्‍यासह बरसत असलेल्या पावसात विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी सर्वच कर्मचारी तीन दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न करत आहे.वार्‍यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असल्याने सबस्टेशन सह 33 र्ज्ञीं लाईनध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता.

साकेत पाटील , वीज वितरण अभियंता घोटी ग्रामीण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com