पाथर्डीत विजेचा लपंडाव; रहिवासी त्रस्त

पाथर्डीत विजेचा लपंडाव; रहिवासी त्रस्त

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

वार्ड क्रमांक 44 मधील मुरलीधर नगर, प्रशांत नगर, गजानन महाराज कॉलनी, स्वामी समर्थ नगर, दामोदर नगर व इतर अनेक भागात सातत्याने वीज पुरवठा (Electricity) खंडित होत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत...

गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या अनियमित लाईट पुरवठ्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. विजेच्या (Electricity) लपंडावामुळे रात्री घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल होत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक वृद्धांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

शनिवारपासून परिसरात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असून लाईट येणे जाणे अनेक वेळा होत असल्याने नेमके लाईट जाण्याचे कारण काय हे रहिवाशांना कळू शकलेले नाही. विजेचा पुरवठा सध्या नियमित असतानाही वीज पुरवठा कमी पडत आहे काय? किंवा अनेक अनेक रोहित्र खराब झाल्याने त्यांचा केव्हाही पावसाळ्यात (Rain) ब्लास्ट होत असतो. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो की काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

दिवसभरात सकाळच्या वेळेसच वीजपुरवठा खंडित होत असल्याने महिला वर्गाला घरगुती उपकरण चालवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुरवठा बंद करायचा असल्यास तसा संदेश नागरिकांना दिला गेला पाहिजे. रहिवाशांनी वीज वितरण कंपनीच्या ऑफिसला फोन केला तर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नेमके विचाराचे कुणाला? कुणाकडे तक्रार करायची? यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

रहिवासी नियमित बील (Electricity Bill) भरत असतानाही महावितरण (Mahavitaran) कंपनीकडून अनियमितपणे वीजपुरवठा होत आहे. बेजबाबदारपणे उत्तरे देऊन दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी रहिवाशांना वेठीस धरत असून विजेची सुविधा व्यवस्थित देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

परिसरात आधीच सोनसाखळ्या चोरीचे घरफोडीचे (Robbery) प्रमाण वाढले असताना रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा बंद होणे गुन्हेगारांना फायदेशीरच ठरत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लवकरच नागरिकांचे शिष्टमंडळ आमदार सीमा हिरे (Seema Hire) व खासदारांची भेट घेणार असून तशी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com