विजेचा लपंडाव; वाढीव दराने ग्राहक त्रस्त

अतिरिक्त कर वगळून मीटर रिडिंग प्रमाणे बिले देण्याची मागणी
विजेचा लपंडाव;  वाढीव दराने ग्राहक त्रस्त

निफाड। प्रतिनिधी Niphad

गेल्या काही महिन्यापासून शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांनाही विजबिलाची सतत होणारी वाढ (The constant growth of electricity) ग्राहकांपुढे डोकेदुखी ठरू लागली आहे.

करोना (Coroan) काळात सर्वच व्यवहार ठप्प झालेले असतांना हाच मोका साधत विजवितरण कंपनीने (Electricity Distribution Company) विजबिलात वाढ केली. ग्राहकांना देखील दरवाढीची आता सवय होत असतांनाच विजवितरण कंपनीकडून आता मोठ्या प्रमाणात विजभारनियमन केले जावू लागले आहे. कधी पोल उभा करण्यासाठी तर कधी तारा ओढण्यासाठी. अनेकवेळा तर विद्युत तारेला स्पर्श करणार्‍या तारा झाडे काढण्यासाठी देखील विजपुरवठा खंडीत (Power outage) केला जावू लागला.

कित्येक तास विज गायब होत असतांनाही विजबिले (Electricity bills) कमी करण्याऐवजी ती वाढतांना दिसत आहे. विजबिलात लावलेले कर, अधिभार, विजगळती, स्थिर आकार, व्याज, मीटर भाडे आदींचा समावेश करून विजबिलाचा आकडा कसा फुगवता येईल यालाच प्राधान्य दिले जाते. तर विजेचे मिटर रिडींग (Electricity meter reading) हे केवळ नावालाच राहिले असून रिडींग प्रमाणे कधीही विजबिल येत नाही.

ग्राहक (Customer) जर स्वत: खर्च करून मिटर घेतो तर मग मिटर भाडे कशासाठी. तसेच विजगळती, स्थिर आकार याचा ग्राहकांशी संबंध तरी काय? मुळात विजेची उपकरणे ही अतिशय जुनाट झालेली. त्यातच ट्रान्सफार्मर (Transformer) जळाला तर तो कधीही वेळेवर दुरुस्त केला जात नाही. तसेच एका सबस्टेशन(Substation) अंतर्गत किमान 8 ते 10 गावे असतांनाही वायरमन संख्या अवघी 3 ते 4 त्यामुळे कर्मचार्‍यांची कमतरता ही नित्याची मोठी डोकेदुखी ठरलेली.

शिवारात तर लोंबकाळणार्‍या तारा, वाकलेले पोल, ट्रान्सफार्मरची झालेली दुरवस्था, तुटके फेज अन् नादुरूस्त केबल असे चित्र सर्रास पहावयास मिळते. खेडे गावात तर सायंकाळी अन् सकाळी विज हमखास गायब झालेली असते व ही गायब झालेली विज केव्हा येईल याची खात्री नाही. विजेचा लपंडाव हा नित्याचाच बनला असतांनाही विजवितरण कंपनी मात्र आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही.

त्यातच विद्युतपंपासाठी वेगळे दर, व्यवसायिक वापरासाठी वेगळे तर घरासाठी वेगळे दर. साहजिकच विजवापराचे असे वेगवेगळे तर शहरी निवाससाठी आणखी वेगळा दर. साहजिकच विजवितरण कंपनी ग्राहक हितापेक्षा स्वहिताला अधिक लक्ष देत विजेची होणारी गळती देखील ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. वाढत्या विजबिलाला लगाम घालून माफक विजबिले द्यावी व सुरळीत विजपुरवठा (power supply) करावा यासाठी ग्रामस्थांनी व वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी अनेकवेळा आंदोलने (Movements), उपोषणे केली.

मात्र त्याचा थोडा देखील फरक विजवितरण कंपनीच्या कारभारावर होतांना दिसत नाही. साहजिकच आता ग्राहक वर्ग सोलर (Solar), सौर ऊर्जा (Solar energy) आदींकडे वळू लागले आहेत. ग्रामीण भागात पवनचक्क्या (Windmills) देखील उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे विजवितरण कंपनीने आपल्या कामकाजात सुधारणा करून पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच माफक विजबिलाची आकारणी करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा विजेचा ग्राहक कमी होत जावून त्याचे परिणाम विज कंपनीलाच भोगावे लागतील हे निश्चित.

Related Stories

No stories found.