आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येवलातालुक्यातील ( Yeola Taluka ) आंबेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ( Aambegaon Society ) चेअरमनपदी शेतकरी विकास पॅनलचे आनंदराव गिते तर व्हा चेअरमनपदी वाल्मिकराव औटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोसायटीच्या कार्यालयात बुधवारी (दि.१८) चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.जे. पाटील यांनी काम पाहिले.

संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने तेरापैकी १२ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.

गावांतर्गत दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चूरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली.

शेतकरी विकास पॅनलचे अशोक गिते,मनोज गिते,आनंदा गिते,पुंडलिक सोनवणे,नितीन काळे ,घनशाम काळे,भाऊसाहेब आव्हाड़, सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखालील १२ जागांवर विजय संपादन करून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी प्रसंगी संचालक माणिक महादू गिते,सुखदेव रामभाऊ आव्हाड,भीमा महादू आव्हाड,गणेश मुरलीधर आव्हाड,दत्तात्रय रतन सोनवणे,दत्तात्रय बाबुराव सुराडे,राजेंद्र भागुजी दराडे,मधुकर भालेराव विजय,कांताबाई चंद्रकांत काळे व मंगल भाऊसाहेब गिते उपस्थित होते.

चेअरमनपदी आनंदराव गिते व व्हाईस चेअरमनपदी वाल्मीकराव औटे यांची निवड होताच शाल,श्रीफळ देऊन व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com