पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकची दिसली 'पॉवर'

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकची दिसली 'पॉवर'

नाशिक | Nashik

कल्याणमध्ये वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग इंडिया (World Power lifting competition) यांच्या मान्यतेने आणि अमॅच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन (armature power lifting association) महाराष्ट्र व नमस्कार मंडळ (Namaskar Mandal) याच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग (State level Power lifting competition) स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी अतुलनीय कामगिरीचे प्रदर्शन करत सर्वांचेच लक्ष वेधले...

या स्पर्धेत पॉवर लिफ्टर्स असो. ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टकडून नाशिकच्या संघात १९ खेळाडूंनी सहभाग घेत विशेष प्राविण्य मिळवले. सब ज्युनिअर (Sub Junior) (१९ वर्षांखालील) पुरुष संघात कुणाल पाळदे - रौप्यपदक, पुरणसिंग राठोर - रौप्यपदक तर दीक्षांत मोरये यांनी कांस्य पदक कमावले.

ज्युनिअर (Junior section) (२३ वर्षांखालील ) पुरुष संघात जयेश झाल्टे - सुवर्णपदक ,ललित खरोटे - सुवर्णपदक आणि महिला संघात कु. माधवी पोतदार - सुवर्णपदक तर कु. सायली बाहेर यांनी रौप्यपदक मिळवले.

सिनियर (Senior Section) (४० वर्षांखालील ) पुरुष संघात नरेंद्र कुलकर्णी - सुवर्णपदक, ज्ञानेश्वर म्हस्के - सुवर्णपदक, नरेश देवाडिगा- सुवर्णपदक,आशय रानडे - सुवर्णपदक, अमोल म्हसळे - रौप्यपदक, जितेंद्र राजपुत - रौप्यपदक, अजय देसाई - रौप्यपदक, तर ज्ञानेश्वर जरे यांनी कांस्यपदक मिळवले.

मास्टर (Master)-१ (५० वर्षांखालील ) महिला संघात डॉ नमिता परितोष कोहोक यांनी सुवर्णपदक कमावले. ज्ञानेश्वर म्हस्के यांनी सिनियर संघात सर्वोत्तम शक्तीत्तोलन करून मानाचा स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र (Strong man of maharashtra 2021) २०२१ हा मानाचा किताब देखील कमावला तसेच त्यांनी नाशिकचे आणि महाराष्ट्रातले नामांकित खेळाडू होण्याचा बहुमान कमावला.

सर्व खेळाडूंना नाशिक अससोसिएशनचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे, उपाध्यक्ष साजिद मन्सूरी यांचे सहकार्य लाभले तर आशय रानडे यांनी प्रशिक्षण दिले.

Related Stories

No stories found.