
नाशिक | Nashik
राज्यातील वीज कर्मचारी (MSEB Employee) महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून तीन दिवस संपावर (Strike) गेल्याने ग्रामीण भागातील बत्ती गूल झाली आहे...
ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्री १२ वाजेपासून तर काही ठिकाणी सकाळपासून लाईट गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट गेल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे (Agricultural works) खोळंबली असून महिलांना घरगुती कामात देखील अडचणी येत आहेत. तसेच काही नागरिकांचे मोबाईल चार्ज नसल्याने फोन सुद्धा लागत नाही.
दरम्यान, नाशिकला (Nashik) वीजपुरवठा करणाऱ्या एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पाचे (Eklahare Thermal Power Plant) कामगार देखील संपात सहभागी झाल्याने मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र वरिष्ठ कर्मचारी आणि पर्यायी कामगारांच्या माध्यमातून सध्या वीजनिर्मितीचे कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.