आडगावला पावसानंतर वीज पुरवठा चार तासांपासून खंडित

आडगावला पावसानंतर वीज पुरवठा चार तासांपासून खंडित

नाशिक । प्रतिनिधी

आडगाव परिसरात गारांसह वादळी पाउस झाल्यानंतर मागिल चार तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे....

वीज गुल झाल्याने येथील कोव्हीड सेंटर व रुग्णालयांना त्याचा फटका बसला अाहे.

आडगाव शिवारातील जत्रा चौफुली जवळील गणेश काॅलनी व शरयुपार्क परिसरात चार तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला असून सर्व परिसर अंधारात बुडाला आहे. याबाबत वायरमन यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केल्यावर फोन स्विच आॅफ येत आहे. वरिष्ठ आधिकारी पगारे यांना फोन केला तर फोन उचलत नाहीत. नाशिक रोड वीज वितरण कार्यालयातील अधिकार्‍यांचे फोन बंद येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मागील चार तासांपासुन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

पावसाळा सुरु होण्या अगोदरच महावितरणचे नाटके सुरु झाले आहे. करोनाची भयानक परिस्थिती असताना वायरमन आधिकारी फोन बंद करुन उत्तर देणे टाळत आहे. बेजबाबदार वायरमन व आधिकारी फोन बंद करून बसत असतील तर त्यांच्य‍ावर कारवाई केलि जावी अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल.

- सुनिल जाधव- शिवसेना उपमहानगर प्रमुख

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com