पोल्ट्री शेड कोसळले; २ हजार ५०० कोंबड्यांचा मृत्यू

पोल्ट्री शेड कोसळले; २ हजार ५०० कोंबड्यांचा मृत्यू

टाकेद | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील खेड येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत वाजे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड वादळी वर्यासह पावसामुळे कोसळले आहे...

यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा चंद्रकांत वाजे यांचा भांचा प्रसंग सावधान दाखवत बाहेर पडल्याने तो बालबाल बचावला.

शेतकरी चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात पोल्ट्री शेड बांधले होते. त्यात तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या.

या कोंबड्या दोन ते तीन दिवसात त्या बाजारात विकण्यासाठी पाठवणार होते. मात्र वादळी वाऱ्याने भिंती व शेडचे लोखंडी अँगल, पत्रे कोंबड्यावर कोसळल्याने २ हजार ५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्ष्यांना खाद्य देण्यात येणारे साहित्य, पाईपलाइन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य, ताडपत्री आदी.साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकरी चंद्रकांत वाजे यांनी सांगितले.

बाळू कचरे, पोलीस पाटील अंकुश वाजे, सखाराम वाजे, संदीप मालुंजकर, स्वप्नील मोरे, हेमराज भामरे आदी ग्रामस्थांनी पाहणी करून शासनाने पोल्ट्री व्यावसायिकाला मदत करावी, अशी मागणी केली आहे.

मी अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री शेडचे बांधकाम केले होते. वादळी वाऱ्यासह पावसामुळे माझे संपूर्ण पोल्ट्री शेड जमिनोदस्त झाले आहे. शासनाकडून मला नुकसानीची भरपाई मिळावी.

चंद्रकांत वाजे, पोल्ट्री व्यावसायिक, खेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com