'या' तारखेपर्यंत नाशिकचे रस्ते चकाचक

पालकमंत्र्यांची माहिती
'या' तारखेपर्यंत नाशिकचे रस्ते चकाचक

नाशिक | Nashik

येत्या १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे (Pits) बुजविले जातील असे ठोस अश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकार्‍यांनी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांना दिले. तसेच अपघाताचे (Accident)१४ ब्लॅकस्पॉटही तातडीने दुरुस्त केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे...

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office)आज पालकमंत्री भुसे यांनी बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी वरील आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. अतिवृष्टी, पुरामुळे यंदा पुल, रस्ते यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी १०० कोटी रुपये लागणार आहे. तर ब्लॅकस्पॉट संपविण्यासाठी केवळ एक कोटी रुपयांची गरज असून ती कामे तातडीने केली जाणार आहेत.

तसेच यावेळी भुसे यांनी सव प्रर्थम खड्डे बुजविण्याला प्राधान्य द्या, असे सांगितले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व खड्डे बुजविले जातील, असे जााहीर केले. त्यावर भुसे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात ज्या ठेकेदारांनी रस्ते बांधकाम केले, त्यांच्याकडून खड्डे बुजवून घ्या, वापरले जाणारे डांबर तपासा, कामाचा दर्जा चांगला असला पाहीजे, यावर लक्ष्य ठेवा, असे सांगितले.

दरम्यान, भुसे यांनी पंधरा दिवसांची मुदत यापुर्वी महापालिका प्रशासनालाही (Municipal Administration) दिली होती. पंरतु, ती संपली तरी शहरातील अनेक मार्गांवर खड्डे कायम आहेत. त्यावरही तीन दिवसात संबधितांशी चर्चा करुन प्रश्न मागी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com