महामार्गावर खड्डे; दुचाकीचालकांच्या अपघातात वाढ

महामार्गावर खड्डे; दुचाकीचालकांच्या अपघातात वाढ

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

सिन्नर बसस्थानकासमोरील (Sinnar bus station) नाशिक-पुणे महामार्गाच्या (Nashik-Pune highway) कडेला मोठमोठे खड्डे (potholes) पडल्याने दुचाकीधारकांच्या अपघातांत (accidents) वाढ होत आहे. महामार्गाच्या कडेने गेलेल्या गॅस पाईपलाईन (Gas pipeline) खोदकामामुळे चांगल्या रस्त्याची वाट लागली असून याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

काही दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला खोदकाम (engraving) करण्यात आले होते. पाईप गाडण्यासाठी खोदण्यात आलेल्या नळीला पुन्हा बुजवताना माती, मुरुमाने बुजवण्यात आल्याने मुसळधार पावसाने (heavy rain) मुरूम, माती वाहून गेली. त्यामुळे खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी आता मोठ्या खटक्या पडल्या असून यामुळे दुचाकीधारकांना यातून गाडी चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे झाले आहे.

या खोल खटकीत दुचाकी अडकत असून दुचाकीचालकासह इतरांना किरकोळ दुखापतीच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी या खटकीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीचालकांसह चारचाकी वाहनांनाही याचा फटका बसत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच ही खटकी झाल्याने स्थानकात बस येताना व बाहेर निघताना अडचण निर्माण होते.

दुचाकी यात अडकल्यास चालक व त्यावरील इतर जण पडणार हे निश्चित. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी तेथील खड्डे (potholes) बुजवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com