महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील ब्राम्हणवाडे (Brahmanwade) येथे पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली असून पाणीपुरवठा (water supply) सुरळीत करण्याच्या मागणी करत महिलांनी ग्रामपंचायतीवर (gram panchayat) हंडा मोर्चा (agitation) काढला.

गेल्या आठवड्यापासून गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत वारंवार प्रशासनाला सांगूनही पाणीपुरवठा (water supply) सुरळीत न झाल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. टंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. टंचाईबाबत तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

हंडा मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनास (Gram Panchayat Administration) घेराव घालत आक्रोश व्यक्त केला. गावाला नायगावसह नऊ गावे पाणीपुरवठा (water supply scheme) योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र, आठवडाभरापासून चेहेडी पंपिंग स्टेशन (Chehedi pumping station) येथे देखभालीचे काम सुरु असल्याने परिसरातील बाराही गावात पाणी नव्हते. मात्र, आता पाणीपुरवठा सुरळीत झाला असून

आदिवासी बहुल भाग (tribal area) असलेल्या चार गल्ल्यांना टाकीतील पाणी संपल्यामुळे पाणीपुरवठा झाला नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा आणला होता. गावानजीक पंतप्रधान पेयजल योजनेचे काम सुरु आहे. या ठिकाणची तपासणी करण्यासाठी एमआयडीसीमध्ये एक दिवस पाणी सोडले होते. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले म्हणून गावासाठी हे पाणी देता आले नसल्याचे ब्राम्हणवाडेचे सरपंच कैलास गीते यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com