टपाल विभाग हाती घेणार 'हि' विशेष मोहीम

भारतीय डाक विभाग
भारतीय डाक विभाग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

प्रगती मैदान, दिल्ली (delhi) येथे दि. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अमृतपेक्स-२०२३ (Amritpaks-2023) या राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनाच्या (National Postage Stamp Exhibition) (फिलाटेली) औचित्याने

दि. ९ व १० फेब्रुवारी या दिवशी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) (SSA) खाते उघडण्याची विशेष मोहीम भारतीय टपाल विभागामार्फत (Indian Department of Posts) भारतभर राबविण्यात येत आहे.

महिला सबलिकरण-सशक्तीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल असून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहचावा, हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ १० वर्षाच्या आतील वयोगटाच्या मुलींसाठी घेता येईल.

तसेच सुरवातीला फक्त रुपये २५० भरून खाते सुरू करता येऊ शकते. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ७.६ टक्के असा आकर्षक व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत दिला जात आहे. तसेच दरवर्षी आर्थिक वर्षात कमीत कमी रुपये २५० आणि जास्तीत-जास्त रुपये एक लाख ५० हजार या खात्यावर जमा करता येऊ शकतात.

या खात्यावर जमा केलेल्या रकमेवर आयकरात सुटही मिळते.त्यामुळे आप आपल्या पाल्यांसाठी १० तारखेच्या आत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा, असे आवाहन भारतीय टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन शंकर अहिरराव यांनी केले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com