जिल्हयात सहा वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचा पदभार

प्रभारींच्या हातीवनसंपदेचा प्रश्न ऐरणीवर
जिल्हयात सहा वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचा पदभार
USER


नाशिक । Nashik

जिल्हयात वनविभागाच्या पश्चिम आणि पूर्व रेंजमधील सहा वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्णवेळ नसल्याने प्रभारींच्या हाती हा कारभार देण्यात आला आहे.

काही दिवसातच नांदगाव येथील वन परिक्षेत्र अधिकारीही सेवानिवृत्त होत असल्याने जिल्ह्यात सात ठिकाणी आरएफओची पदे रिक्त राहणार असून त्यांचा कारभार प्रभारीच पाहणार आहे, दरम्यान पूर्णर्वेळ वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तेथील वनसंपदेचा प्रश्न एरणीवर येण्याची श्नयता आहे.

त्यामुळे त्याठिकाणी तात्काळ पूर्णर्वेळ वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) नेमण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात वनतस्करी होत असते. असे असूनही पश्चिम विभागासह नाशिक पुर्व विभागातील वनक्षेत्र अधिकारी पदे रिक्त आहे.

काही दिवसांपुर्वीच पश्चिम नाशिक वनविभागाच्या पेट्रोलिंग युनिटवर वलसाडमध्ये तस्कर खोरांनी हल्ला केला होता. जमावाने पेट्रोलिंग व्हॅनवर दगडफेक केली आणि अधिकार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिक्तपदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हरसूल, त्र्यंबकेश्वर, ननाशी आणि सुरगाणा आदी ठिकाणी वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून, वन्यजीवांची संख्या जास्त आहे.

या परिसरात खैर, अर्जुन, सदा, बेहदा, मोह, सागवान यासारखी अमुल्य वनसंपदा आहे, हरसूलकडे पूर्णवेळ अधिकारी नाही. त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राची तिच अवस्था असून इगतपुरी, देवळा आणि नांदगाव आरएफओंच्या रिक्तपदांची भर पडणार आहे.

तर ननाशी, येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, हरसूल नाशिक वनवृत्तातील संवेदनशील ठिकाणी पुर्णवेळ अधिकारी नसल्याने वनसंपदेच्या संवर्धन व संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ननाशी, येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, हरसूल यासारख्या रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी पद रिक्त आहे.

या रेंजचा अतिरिक्त भार इतर वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. पूर्व वन विभागात सध्या दोन पदे रिक्त आहे. येवला आणि देवळा वनपरिक्षेत्रांचा अतिरिक्त कारभार अन्य अधिकार्‍यांवर आहे.

नांदगाव रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या सेवानिवृत्तीनंतर तेही पद रिक्त होणार असल्याचे पूवर्चे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी म्हट्ले आहे. तर हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि ननाशी वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त भार अन्य आरएफओंवर आहे.

त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले आहे. लवकरच गुजरात वन व महाराष्ट्र वन अधिकार्‍यांचा संयुक्त शांतता बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com