
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्रातील (Satpur and Ambad MIDC) उद्योगांच्या परिसरात मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात टपर्यांचे अतिक्रमण (Encroachment) वाढू लागलेले असल्याने दिवाळीनंतर (Diwali) विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांनी सांगितले...
सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात लघु व मध्यम उद्यागे स्थिरावलेले आहेत. या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांचा ताबा टपरी धारकांनी घेतला असून या ठिकाणी विविध बेकायदेशीर व्यवसाय स्थापन केले असल्याच्या तक्रारी एमआयडीसीकडे उद्योग करु लागल्याने एमआयडीसीने मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वरे दिवाळीनंतर विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे नितीन नेर यांनी सांगितले. या मोहीमेत एमआयडीसी, नाशिक मनपा व पोलीस प्रशासन अशी संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असून या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील सर्व बेकायदेशिर टपर्यांचे अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.