यंदा द्राक्षाच्या बंफर पिकांची शक्यता

जिल्ह्यातील वाढती थंडी द्राक्षाला त्रासदायक
यंदा द्राक्षाच्या बंफर पिकांची शक्यता

नाशिक । Nashik

जिल्ह्यात हवामानाच्या बदलामुळे द्राक्ष बांगांची उशिरा झालेली छाटणी, परतीच्या पाऊसाने जिल्ह्यात काहीअंशी झालेले नुकसान यामुळे द्राक्ष हंगाम लांबणार आहे.

यंदा हवामान बदलामुळे अर्थात वाढणार्‍या थंडीमुळे मण्याची फुगवण कमी होणार असली तरी चांगल्या गुणवत्तेचे द्राक्ष खायला मिळण्याची शक्यता आहे. एकुणच फेब्रुवारी ते एप्रिल या काळात एकाच वेळी बंफर पिक बाजारात येणार असल्याचा अंदाज द्राक्ष अभ्यासकांनी वर्तविला आहे.

यंदा पाऊस जिल्ह्यात उशिरा आल्यामुळे शेतकर्‍यांचे गणित चुकल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिले दोन महिन्यात फारसा पाऊस न पडल्यामुळे विशेषत: द्राक्षांची छाटणी उशिरा झाल्या आहे. तसेच जिल्ह्यातील मोजक्या धरणे भरले असुन मागील वर्षाच्या तुलनेत यदां धरणसाठा कमी आहे. यंदाच्या बदलत्या हवामानात परतीच्या पाऊसाने जिल्ह्यातील काही भागात मोठे नुकसान झाले आहे. यातून बहुतांशी द्राक्ष उत्पादक शेतकरी बचावला आहे. मान्सुन परतल्यामुळे शेतकर्‍यांची आता नुकसानीची भिती दूर झाली आहे.

गेल्या आठ दिवसापासुन जिल्ह्यातील तापमानात मोठी घट होण्यास प्रारंभ झाल्यानंतर आज (दि.10) नाशिक जिल्ह्यातील तापमान 11.8 अंश सेल्सीअसपर्यत खाली आले आहे. या वाढलेल्या थंडीचा परिणाम जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर होणार आहे. यात घसरत्या तापमानामुळे आता मण्यांची फुगवण कमी होणार आहे. तसेच थंडीमुळे फुल किडे - आळईचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. यातच दिवाळी असल्याने मजुर गावाकडे परतणार असल्याने देखभालीवर परिणाम होणार आहे. असे असले मण्याची फुगवण वगळता जिल्ह्यात सर्वत्र यंदा द्राक्षांचे दर्जेदार - चांगले उत्पन्न येईल असे वातावरण आहे.

यंदा छाटणी लांबल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात द्राक्ष काढणीसाठी येणार आहे. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल अशा तीन महिन्यात जिल्ह्यात द्राक्षांचे बंफर पीक येणार आहे. या मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे द्राक्षांच्या भावात घसरणीची शक्यताही जाणकार व्यक्त करीत आहे. एकुणच यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष ऊत्पादनामुळे दर्जेदार द्राक्ष नागरिकांना खायला मिळणार आहे.

13 ते 17 नोव्हेंबरला मिळणार दिलासा

जिल्ह्यात पारा 12 अंशांवर आला असुन यामुळे द्राक्ष फुगवण मंदावणार असली तरी ऊत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. वातावरण चांगले असल्याने औषधाचा खर्च वाचणार आहे. यात येत्या 13 ते 17 तारखेला तापमानात काहीसी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

- शिवाजी देशमुख, द्राक्ष अभ्यासक नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com