Video : जागतिक परिचारिका दिन : सकारात्मक विचारांनी करोनावर मात शक्य

Video : जागतिक परिचारिका दिन : सकारात्मक विचारांनी करोनावर मात शक्य

वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. करोना संकटकाळात परिचारिका करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत.

आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म १२ मे रोजी झाला. तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. त्या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण केले.

आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. नाशिकमधील परिचारिकांनी कोरोना काळात मोठे काम केले आहे. कुटुंबाच्या हितापेक्षा रुग्णांचे हित पाहून त्यांनी रात्र-दिवस सेवा केली आहे. सर्वांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन काम केले. जाणून घ्या त्यांचे अनुभव...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com