वर्षभरानंतरही पॉझिटिव्ह, लॉकडाऊन नावाची दहशत कायम

वर्षभरानंतरही पॉझिटिव्ह, लॉकडाऊन नावाची दहशत कायम
लॉकडाऊन

नाशिकरोड । Nashik

करोना महामारीमुळे गेल्यावर्षी 22 मार्च रोजी एक दिवसाचा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता.

लॉकडाऊन झाला त्यादिवशी 22 मार्च हा दिवस होता. या घटनेला काल एक वर्ष पूर्ण होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पॉझिटिव्ह व लॉकडाऊन नावाची दहशत अद्यापही सुरूच आहे.

गेले संपूर्ण वर्ष हे करोना महामारीमुळे चर्चेचे ठरले. गेल्यावर्षी दिवाळीनंतर काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल झाले. त्यानंतर हळूहळू शहरातील व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली. परंतु नवीन वर्ष उजाडताच फेब्रुवारी महिन्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व परिसरात करोनाचा प्रचंड उद्रेक होत आहे. गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून रुग्णांचे आकडे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. गेल्यावर्षी मे व जूनमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती या वर्षी मार्च महिन्यात सुरू झाली. रुग्णांच्या वाढीमुळे शहरातील अनेक खासगी हॉस्पिटल आताच फुल्ल झाले आहेत.

करोना रुग्ण वाढू नये म्हणून प्रशासनाकडून पाहिजे ती खबरदारी घेतली जात आहे. त्याच प्रमाणे मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतर, गर्दी करू नये असे अनेक नियम शासनाने लागू केले आहेत. असे असतानासुद्धा नागरिक नियम पाळत नसल्याने करोनाचा उद्रेक होत आहे. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह व लॉकडाऊन या नावाची दहशत सुरू होती तशी दहशत आज सुद्धा नागरिकांमध्ये पुन्हा एकदा दिसून येत आहे.

पॉझिटिव्ह हा शब्द उच्चारताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो तर लॉकडाऊन म्हटल्यावर व्यापारीवर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. परिणामी या दोन शब्दांची दहशत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com