कोविड काळात सकारात्मकता महत्वाची - डॉ गायकवाड

कोविड काळात सकारात्मकता महत्वाची - डॉ गायकवाड

नाशिक | प्रतिनिधी

कोविड जन्य परिस्थितीत समाजात असलेले भयभयीत वातावरण, त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली गेली पाहिजे. कोविड काळात घाबरून न जाता सकारात्मक वातावरण तयार केले गेले पाहिजे असे संमोहन तज्ञ डॉक्टर शैलेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

जेसीआय पंचवटी होली सिटी आयोजित 'आरोग्य सप्ताह २०२१' अंतर्गत 'संजीवनी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहिले पुष्प 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर गुंफण्यात आले. याप्रसंगी डॉ गायकवाड हे बोलत होते. याप्रसंगी नाशिक महानगरपालिका प्रभाग १ चे नगरसेवक अरुण पवार उपस्थित होते.

सध्याच्या कोविड काळात सकारात्मक विचार, दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. कोविड रुग्णाने नकारात्मकता सोडून सकारत्मकतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे डॉ गायकवाड म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक अरुण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोविड जन्य परिस्थितीत अशा प्रकारच्या व्याख्यानमाला आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले.

प्रारंभी, पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष जेसी पवन पवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जेसी कविता दराडे यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसीआय सेनेटर गौरव धाकराव यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com