लोकमान्य नेतृत्व : रामदास चारोस्कर

लोकमान्य नेतृत्व : रामदास चारोस्कर

दिंडोरी | संदीप गुंजाळ Dindori

दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघात ( Dindori - Peth Assembly Constituencies)कोणतीही मोठी सत्ता हाताशी नसताना केवळ वैयक्तिक करीश्म्याच्या जोरावर आपल्या कार्यकर्तृत्वाने हजारो मनावर राज्य करणारे रामदास चारोस्कर हे आगळे वेगळे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची वेल अजूनही मोहरलेली असून कार्यकर्त्याचे मोहोळ आपल्या भोवती बाळगणारे रामदास चारोस्कर आज लोकमान्य नेते झाले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday of Ramdas Charoskar )त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

दिंडोरी शहरात आणि दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात आपल्या कामाने वेगळी छबी उमटवलेले रामदास चारोस्कर हे जननायक म्हणून काम करतात. प्रश्न कोणताही असो त्याचे उत्तर रामदास चारोस्कर यांच्याकडे सातत्याने ठरलेले आहे. जनतेच्यां प्रश्नावर अधिकार्‍यांंच्या टक्केवारीला न भुलता त्यांना चांगल्या दर्जांची कामे करायला भाग पाडणारा नेता म्हणून चारोस्करांचे नाव आज अग्रस्थानी आहे.

दिंडोरी शहरात किसनराव चारोस्कर, प्रकाशबापू देशमुख यांच्या निधनानंतर सर्वसमावेशक नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी कोण भरून काढणार, असा प्रश्न दिंडोरीकरांना भेडसावत होता. रामदास चारोस्करांच्या रुपाने ती पोकळी भरून निघाली आहे. कोणतेही काम चुटकीसरशी मार्गी लावणारे रामदास चारोस्करांनी आपल्या कामाचा दबदबा मंत्रालयातही निर्माण केला आहे. त्यामुळेच सामान्यांचे प्रश्न सुटत आहे. रामदास चारोस्कर हे एक वेगळे रसायन आहे, हे कोणीही मान्य करेल. तालुक्याच्या राजकारणात रामदास चारोस्कर नावाची एक शक्ती आहे, हे मान्य व्हायला लागले आहे. कोणतीही निवडणूक आली की, रामदास चारोस्करांची नेमकी काय भूमिका राहिल, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडतो.

मग त्यातून ते निकटवर्तीय खबर्‍यांमार्फत चारोस्करांच्या भूमिकेची माहिती घेतात व पुढील रणनीती ठरवतात. चारोस्कर अनेक धक्क्यातून सावरत सावरत कधी विजयालाही सामोरे जात आहे, कधी पराजयालाही सामोरे जात आहे. परंतु तरी सदैव जनतेत टिकून जनतेची समस्या सोडवणारे चारोस्कर रामाचे दास आहेच, परंतु जनतेलाच राम मानून त्यांची सेवा करणारे खरे दास आहे. मागील काळात चारोस्कर काँग्रेसमध्ये असताना दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत रा. काँ. बरोबर आघाडी करून काँग्रेसला बहुमत मिळवून दिले तर काँग्रेसला पहिले नगराध्यक्ष मिळवून दिले. तर आता शिवसेनेत असतांनाही त्यांनी शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान केला आहे. यावरुन पक्षाऐवजी दिंडोरीचे राजकारण चारोस्करांंवरच अवलंबून असते व दिंडोरीच्या जनतेंचा चारोस्करांवरील असलेला विश्वास ंहे सिध्द होते.

आजही वाढदिवसानिमित्त प्रत्येक पक्षाकडून वाढदिवसानिमित्त मिळणार्‍या भरभरुन शुभेच्छा ही चारोस्कर साहेब सर्व समावेशक नेतृत्व असल्याची साक्ष देते. शेतकरी नेता, आदिवासी नेता, सर्वसामान्यांचा नेता अशा विविध रूपात आपल्याला रामदास चारोस्कर भेटतात. 12 डिसेंबर 1969 साली जन्मलेल्या रामदास चारोस्करांचे बालपण दिंडोरीतच गेले. घरातील परिस्थिती हलाखीची होती. वडील किसनराव चारोस्कर यांचा लाकडाच्या वखारीचा व्यवसाय होता. कै. किसनराव चारोस्कर हे समाजकारणही करीत असत. ते आलेल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवत. दिंडोरी ग्रामपालिकेचे सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद असा त्यांचा राजकीय प्रवास होता. दिंडोरी शहरात शिक्षणक्षेत्रात त्यांनी काम केले होते. वाळूदादा कराटे आश्रमशाळा स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मिळून मिसळून राहणारा कै. किसनरावांचा स्वभाव होता. ते किसन मेंबर नावानेच परिचित झाले होते. कुठेही गेले तरी किसन मेंबर आले असेच म्हटले जायचे. त्यांचे संस्कार रामदास चारोस्कर यांच्यावर झाले.

अगदी लहानपणापासूनच रामदास चारोस्कर यांना श्रमदानाची आवड होती. रामदास चारोस्कर आठवीला असतानाच मॅकडोवेल कंपनीत कामाला लागले. तेथे दोन वर्षे काम केले व स्वत: कमवू शकतो, हा विश्वास बालपणातच दिला. नंतरच्या काळात काँग्रेसच्या राजकारणात किसनराव व रामदास चारोस्कर सक्रिय राहिले. विधानसभा निवडणूक लागली. सन 1995-96 मध्ये किसनराव चारोस्कर व रामदास चारोस्कर हे दिंडोरी विधानसभेसाठी तिकीट मागायला पक्षाकडे गेले. त्याठिकाणी तरुण चारोस्करांना प्रश्न विचारले गेले. किसनरावांनाही प्रश्न विचारले गेले. त्यावेळी किसनरावांनी आपल्या मुलाला तिकीट मिळावे, असा आग्रह काँग्रेस श्रेष्ठीकडे धरला होता. कारण रामदासमध्ये सर्व गुण त्यांना दिसले होते. आपला मुलगा आमदार व्हावा, हे स्वप्न त्यांचे होते. पण पक्षाने किसनरावांनाच तिकीट दिले. रामदास चारोस्करांनी वडिलांचा प्रचार केला.

निकाल यायचा बाकी होता. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले किसनराव जि. प. च्या बैठकीसाठी नाशिक येथे निघाले. ढकांबे फाट्याजवळ हॉटेल वाडाजवळ असलेल्या वळणावर काळाने त्यांना गाठले व अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नंतर काही दिवस गेले. निवडणुकीचा निकाल लागला. कै. किसनराव चारोस्कर आमदारकी जिंकले होते. पण नियतीने त्यांना हयात ठेवलेले नव्हते. निवडून येऊन काही उपयोग झाला नाही. शेवटी महाविद्यालयात शिकणार्‍या रामदासचा पोटनिवडणुकीला उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. नियतीने त्यांची उमेदवारी फायनल केली. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे दिंडोरीला आले. टोलेजंग सभा झाली. बाळासाहेब ठाकरे दिंडोरीला आल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेचीच झाली. ठाकरेंच्या भाषणाने जनता प्रभावित झाली. टाळ्यांचा कडकडाट पडला. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराच्या निवडीच्या शक्यता वाढल्या, परंतु चारोस्करांनी संयमाने प्रचार केला. जनतेने आपला कौल दिला. काँग्रेसच्या रामदास चारोस्करांना जनतेने निवडून दिले.

पहिली पाच वर्षे सर्वात तरुण आमदार म्हणून रामदास चारोस्कर यांच्याकडे पाहिले गेले. अतिशय अभ्यासू पद्धतीने रामदास चारोस्करांनी तालुक्याचे प्रश्न सोडवले. दुसर्‍या पंचवार्षिकच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याचवेळी रामदास चारोस्करांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही मिळाली. ते 12,000 मतांच्या फरकाने निवडून आले. तापी खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाबरोबर लाल दिव्याचे भाग्यही त्यांना मिळाले. तिसर्‍या पंचवार्षिकला नशिबाने त्यांना साथ दिली नाही. त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यांना पराभव पत्करावा लागला. आपल्या राजकीय कौशल्याने सुनीता चारोस्कर यांना जिल्हा परिषद सदस्य बनवले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने पुन्हा नाकारले. त्यांनी यावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले व शिवसेनेचा प्रचार करून माजी आमदार धनराज महाले यांना निवडून आणले. चारोस्कर किंगमेकर म्हणून परिचित झाले. नंतर आदिवासी विकास महामंडळ, मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत चारोस्करांचा करिष्मा दिसला. नंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त झाली. काँग्रेसला आधार आला.

राहुल गांधीची सभा झाली. या सभेने विक्रम मोडला. काँग्रेसचे चारोस्कर विजयी होतील, अशी चिन्हे निर्माण झाली. परंतु पेठ तालुक्यात साहेबांना अपेक्षेपेक्षा कमी मते पडली. पेठ तालुक्यातील यंत्रणा विस्कटली व चारोस्करांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. चारोस्करांची निवडणूक काळातील एकूण एक हालचाल गुप्त न रहाता सगळीकडे पोहोचल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचे विश्लेषण करण्यात आले. परंतू आता त्यातून शिकवण घेत पुढील विधानसभा निवडणूकीत जोमाने लढवत मागील चुकांचा शोध घेत यंदा विधानसभेत चारोस्करांना पाठवरणाच असा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. आपल्या सौभाग्यवती सुनीताताई चारोस्करांना जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापतीपदी विराजमान करीत अवघ्या जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.

लोकसभा निवडणूकीत डॉ. भारती पवार यांना चारोस्करांची मोठी मदत झाली. चारोस्करांनी डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी भव्य मेळावा दिंडोरी येथे घेऊन आपल्या शक्तीची चुणूक दाखवून दिली. स्थानिक उमेद्वार असतांना डॉ. भारती पवार यांना मोठा मतािधिक दिंडोरी - पेठ तालुक्यातून मिळवून देण्यात चारोस्कर साहेबांचेच श्रेय असल्याचे आजही बोलले जाते. नंतरच्या काळात शिवसेनेने त्यांना आमंत्रण दिले. विधानसभेत त्यांना तिकीट नाकारल्याने जनतेने शिवसेनेलाही नाकारले. त्यामुळे राष्ट्रवादीचा विजय झाला. आज रामदास चारोस्कर सर्व जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहे. कधीही कोणाशी वैरभावाने न वागता निवडणुकीपुरते राजकारण व नंतर अखंड जनसेवा हाच त्याचा ध्यास आहे.

आजही चारोस्कर जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र धडपड करीत आहेत. दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची विकासकामे दिंडोरी शहरात आणि तालुक्यात झाले आहेत.चारोस्कराच्या स सरळमार्गी स्वभावामुळे सर्व दिंडोरी शहर चारोस्करमय झाले आहे. चारोस्करांचा शब्द मंत्रालयात प्रमाण मानला जातो. अधिकारी वर्गावर त्यांचा वचक आजही आहे. त्यामुळे जनताही चारोस्करांची फॅन आहे. रामदास चारोस्करांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्व कार्यकर्ते मोठ्या सख्येने शिवसेनेत आले आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून चारोस्करांची ओळख आहे. चारोस्करांनी समाज कार्याला प्राधान्य दिले आहे. प्रत्येंक गरीबाच काम ते करतात. शेतकरी त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात. त्या समस्या सोडवण्याचे काम ते करतात. असा लोकनेता जनतेच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

माजी आमदार रामदास चारोस्कर साहेबांचे कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व ह्या त्रिसुत्रीने सामाजिक व राजकीय जीवनात ज्या सामान्य जनतेच्या अशक्य काम जे असेल व शक्य करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करुन वेळप्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकारण 90 % व 10 टक्के राजकारण या ‘बाळासाहेब ठाकरे ’ यांच्या उक्तीप्रमाणे समाजासाठी कायम सेवापुर्ती राहणारे लोकनेते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! साहेबांच्या लोकहितासाठी कायम यटोकाट प्रयत्न असून नगरपंचायत असो, अन्यथा पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रश्न सोडवून शेतकर्यांना हमीभाव व कष्टकरीच्या प्रश्नांवर ऊस दरवाढ, दुध दरवाढ या आंदोलनाचा आक्रमक व यशस्वी पवित्रा घेवून जमीनावरच्या शेवटच्या माणसाला समाधान भेटत तो पर्यंत लक्ष देण्याचा पवित्रा असणार्या नेतृत्वाला मानाचा मुजरा....!

अभिषेक देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर

साहेब आमदार असताना मी माझ्या गावाचे तसेच पंचक्रोशीतील अनेक छोटी मोठी कामे साहेबांकडे घेऊन जात असे. रस्ते, पाझरतलाव, शिक्षण व आरोग्याचे प्रश्न, गाव विकासाची कामे , वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे साहेबांच्या माध्यमातून करू लागलो. साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. माझे सामाजिक कार्य पाहून मला गावकर्यांनी उपसरपंच या पदावर काम करण्याची संधी दिली. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या संधीचे सोने केले. पश्चिम पट्ट्यातील अनेक गावामध्ये माझा साहेबांमुळे परिचय व संपर्क वाढला.यश अपयश प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतच असते. साहेबांची आमदारकी गेल्यावरही साहेबांचे समाजकारण बंद झाले नाही. उलट त्यांनी अधिक जोमाने जनसेवा सुरु केली. साहेबांचा लोकसंपर्क मोठ्या प्रमाणावर वाढला. साहेबांचे कर्तुत्व पाहून काहीना पोटात गोळा यायला लागला. पुढील काळात साहेब सत्तेपासून व लोकांपासून कसे बाजूला राहतील याचाही प्रयत्न काही राजकीय मित्रांनी केला. मात्र साहेब स्वत: एक हिरा असल्याने ते अंधारात किंवा कठीण काळात देखील चकाकणारच! पुढील 2009 च्या विधानसभा निवडणुकीत साहेबानी उमेदवारी केली नाही पण साहेबांमुळे या निवडणुकीत इतिहास घडला. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. 2014 ला साहेबाना ऐनवेळी काँग्रेस कडून उमेदवारी करावी लागली. त्यांनी स्व हिमतीवर मिळवलेली मते मिळाली तर साहेब कुठल्याही पक्षात गेले तरी जनता साहेबांच्याच पाठीमागे उभी राहते. साहेब दिंडोरी विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील विजयाचे गणित नक्कीच घडवू शकतात तसेच बिघडवूही शकतात हे त्यांनी यापूर्वी दाखवून दिले आहे.

वसंत थेटे, माजी उपसभापती पंचायत समिती, दिंडोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com